Trisha Krishnan politics, Thalapathy Vijay TVK : सुपरस्टार थलपथी विजय यांची राजकारणात एन्ट्री एखाद्या हिट चित्रपटासारखीच झाली आहे. तामिळनाडूमध्ये विजय यांचा टीव्हीके हा पक्ष सर्वाधिक जागा जिंकलाय. टीव्हीकेकडून सत्तास्थापनेसाठी पावले उचलली जात आहे. विजय यांच्या टीव्हीकेने १०८ जागा जिंकून इतिहास रचलाय. विजय यांच्या यशाचा जल्लोष तामिळनाडूमध्ये सुरू आहेच. पण विजय यांच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. न्यूज २४ च्या रिपोर्टसनुसार अभिनेत्री त्रिशा कृष्णनही तामिळनाडूच्या राजकारणात सक्रीय होऊ शकते.
मिळालेल्या माहितीनुसार, साऊथची सुंदरी त्रिशा तामिळनाडूच्या राजकारणात प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे. त्रिशा टीव्हीके पार्टीकडून पोट निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकते. रिपोर्ट्सनुसार, लवकरच त्रिशा विजय यांच्या टीव्हीके पक्षात अधिकृत प्रवेश करेल. त्रिशाने पक्षात सामील होऊन तामिळनाडूतील तिरुचिरापल्ली पूर्व मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवावी, यासाठी TVK नेते उत्सुक आहेत.
विजय राजीनामा देणार ?
थलापती विजय यांनी विधानसभला २ जागेंवरून निवडणूक लढवली होती. चेन्नईमधील पेरांबूर आणि तिरुचिरापल्ली पूर्व या दोन्ही मतदारसंघात विजय यांना जिंकले आहेत. आता कायद्यानुसार, विजय दोन्ही जागा ठेवू शकत नाहीत. त्यांना एका जागेवर राजीनामा द्यावा लागेल. त्या ठिकाणी पोट निवडणुका लागतील. १४ दिवसांच्या आत विजय यांना एका जागेचा राजीनामा द्यावा लागेल. त्यानंतर, ते रिक्त करतील त्या जागेवर पोटनिवडणूक जाहीर केली जाईल.
त्रिशा कृष्णन विजयच्या TVK मध्ये प्रवेश करणार?
मिळालेल्या माहितीनुसार, विजय आणि त्यांच्या पक्षाचे सदस्य पेरांबूर मतदारसंघ कायम ठेवावा यासाठी उत्सुक आहेत. कारण तेथील पोरबंदर येथील विजयाचे मताधिक्य जवळपास दुप्पट आहे. हा मतदारसंघ राज्य सचिवालयाच्या जवळही आहे. त्यामुळेच विजय तिरुचिरापल्ली पूर्व मतदारसंघातून राजीनामा देण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विजय आणि टीव्हीकेचे नेते आता त्रिशा कृष्णन यांना त्या जागेवरून निवडणूक लढवण्यासाठी मनवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, त्रिशा यांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसल्यामुळे राजकारणात येण्याची फारशी इच्छा नाही. पुढील २ दिवसांत यावर निर्णय होऊ शकतो.
थलापती विजय यांची राजकीय एन्ट्री ग्रँड झाली. तामिळनाडू विधानसभेत २३४ जागा आहेत, त्यापैकी १०८ जागा मिळवून विजय यांचा पक्ष सर्वात मोठी पार्टी म्हणून उदयास आली. पण बहुमताचा आकडा ११८ गाठण्यासाठी त्यांना अजून १० जागांची गरज आहे. त्यामुळेच सरकार स्थापन करण्यासाठी टीव्हीकेला आघाडी करणे अत्यावश्यक आहे. काही वृत्तांनुसार टीव्हीके ५९ जागा जिंकलेल्या डीएमकेसोबत हातमिळवणी करू शकते. तर इतरांच्या दाव्यानुसार एआयएडीएमके (४७ जागा) सोबतही युती शक्य आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विजयने सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रण मिळावे म्हणून राज्याचे राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांनाही पत्र लिहिले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.