Pension Scheme : राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! पेन्शनचा प्रश्न अखेर सुटला, वाचा नेमका काय घेतला निर्णय?

Old Pension Scheme Maharashtra : पेन्शनसंदर्भातील प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी लागला असून सरकारने सुधारित NPS योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जाणून घ्या नवीन GR आणि कर्मचाऱ्यांना मिळणारे फायदे.

Pension Issue Resolved : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर समोर आली आहे. पेन्शनसंदर्भातील प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी लागल्याने हजारो कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. या निर्णयामुळे निवृत्त आणि कार्यरत कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण असून, दीर्घकाळ सुरू असलेल्या मागण्यांना अखेर यश मिळालं आहे. सरकारच्या या निर्णयाचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेला पेन्शनचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. राज्य सरकारने सुधारित निवृत्ती वेतन योजनेची (NPS) अंमलबजावणी जाहीर केली आहे. जुनी पेन्शन की नवीन पेन्शन या वादात अडकलेल्या कर्मचाऱ्यांचा संभ्रम आता दूर झाला आहे. वित्त विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय (GR) निर्गमित केल्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. २०१४ पासून पेन्शनसाठी आंदोलन करणाऱ्या आणि गेली दोन वर्षे या निर्णयाच्या प्रतीक्षेत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी हा मोठा विजय मानला जात आहे. या नवीन निर्णयामुळे राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली (NPS) लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना आता सुधारित योजनेचा लाभ घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे हजारो सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीनंतरच्या आर्थिक सुरक्षेचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com