राजकीय भूकंपाची चाहुल लागताच मुख्यमंत्र्यांनी टाकला मोठा डाव; विरोधकांना विजय यांचा 'चेकमेट'

Tamil Nadu Politics: तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि TVK प्रमुख सी. जोसेफ विजय यांनी मोठा राजकीय डाव टाकलाय. एक नवीन आघाडी करत त्याला ‘सेक्युलर सोशल जस्टिस विक्ट्री अलायन्स’ हे नाव देण्यात आले.
Tamil Nadu Politics:
Vijay’s TVK-led Secular Social Justice Victory Alliance in Tamil Nadusaam tv
Published On
Summary
  • मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्या नेतृत्वाखाली नव्या आघाडीची घोषणा

  • TVK नेतृत्वाखालील आघाडीला ‘सेक्युलर सोशल जस्टिस विक्ट्री अलायन्स’ हे अधिकृत नाव देण्यात आले

  • नव्या आघाडीमुळे तामिळनाडूच्या राजकारणात खळबळ

सरकार अस्थिर करण्यासाठी विरोधक एकवटत असतानाच मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी मोठा डाव खेळलाय. मुख्यमंत्र्यांच्या या डावामुळे विरोधकांचा गेम ओव्हर झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालीय. आता दक्षिण भारतीय राजकारणात एका नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. विरोधकांच्या डावाआधीच विरोधकांना मुख्यमंत्री विजय यांनी चेकमेट केलंय.

Tamil Nadu Politics:
भाजपला मोठा धक्का! नितेश राणेंच्या निकटवर्तीय नेत्याचा शेकडो कार्यकर्त्यांसह मनसेत प्रवेश

विजय यांच्या नेतृत्वाखाली टीव्हीके पक्षानं एका पक्षसोबत आघाडीची घोषणा केली आहे. 'धर्मनिरपेक्ष सामाजिक न्याय विजय आघाडी' (Secular Social Justice Victory Alliance) असे या आघाडीचं नाव आहे. या युतीचा देशातील आगामी सार्वत्रिक निवडणुकांमधील राजकीय समीकरणे आणि मतदारांच्या आधारावर महत्त्वपूर्ण परिणाम होऊ शकतो. यामुळे दक्षिण भारतीय राजकारणात एका नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे.

Tamil Nadu Politics:
CM थलपती विजय दिल्लीत, PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

विरोधी पक्षांनी TVK विरोधात विविध पक्षांना एकत्र आणण्याच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती मिळताच विजय यांनी राजकीय डाव खेळलाय. चेन्नईतील पनैयूर येथील टीव्हीके (TVK) मुख्यालयात आयोजित एका समन्वय बैठकीत या नवीन युतीची घोषणा करण्यात आलीय. तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि टीव्हीकेचे प्रमुख सी. जोसेफ विजय यांनी टीव्हीके मुख्यालयात काँग्रेस, व्हीसीके (VCK), एडीएमके (ADMK) आणि आययूएमएल (IUML) यांसारख्या युतीतील भागीदार पक्षांच्या नेत्यांची दुसऱ्यांदा भेट घेतलीय.

Tamil Nadu Politics:
जरांगेंच्या आंदोलनादरम्यान सरकारचा मोठा निर्णय; 3 जातींचा ओबीसींमध्ये समावेश

एएनआयच्या माहितीनुसार, काँग्रेस, विदुथलाई चिरुथैगल काची (VCK), इंडियन युनियन मुस्लिम लीग आणि मारुमलालर्ची द्रविडा मुन्नेत्र कळघम (MDMK) यांसारखे प्रमुख सहकारी पक्ष या बैठकीत सहभागी होणार असल्याचं TVK च्या सूत्रांनी आधीच स्पष्ट केले होते. ही नवीन आघाडी TVK च्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आली आहे. तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये विजय याचे नेतृत्व करत आहेत, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते माणिकम टागोर यांनी या नवीन आघाडीबाबत भाष्य करताना दिलीय.

सीपीएम आणि सीपीआय बैठकीपासून दूर

सीपीएम आणि सीपीआय या बैठकीत सहभागी न होण्याचा निर्णय घेत त्यापासून दूर राहिले. १ जुलैपासून औपचारिक आघाडीबाबतच्या चर्चेवर बहिष्कार टाकण्याची ही त्यांची सलग दुसरी वेळ आहे. या निर्णयाचे स्पष्टीकरण देताना सीपीएमचे राज्य सचिव पी. षण्मुगम यांनी म्हणाले की, विधानसभेतील स्थिरता टिकवण्यासाठी डाव्या पक्षांकडून बाहेरून पाठिंबा घेतला जात आहे.

राष्ट्रीय नेतृत्वाच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि टीव्हीके (TVK) यांच्यात मतभेद?

"राष्ट्रीय नेतृत्वाच्या प्रश्नावरून टीव्हीके आणि काँग्रेस यांच्यात सार्वजनिकरीत्या मतभेदांमुळे तणाव अधिकच वाढू लागलाय. २०२९ च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी विजय यांना पंतप्रधानपदाचे संभाव्य उमेदवार म्हणून सादर करणाऱ्या टीव्हीकेचे आमदार आणि मंत्र्यांमध्ये खुद्द मुख्यमंत्र्यांचाही समावेश आहे. टीव्हीकेकडून करण्यात येत असलेल्या विधानांना तामिळनाडू काँग्रेस समितीच्या नेत्यांनी तीव्र विरोध दर्शवलाय.

काय म्हणाले काँग्रेस नेते?

राहुल गांधी हेच विरोधी पक्षांच्या राष्ट्रीय आघाडीचे नेते आहेत, असे काँग्रेस नेते एस. राजेश कुमार यांनी ठामपणे सांगितलंय. या एकमताला बाधा आणण्याचा कोणताही प्रयत्न झाल्यास, राज्य मंत्रिमंडळातील सहभागाबाबत पक्ष फेरविचार करू शकतो, असा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यानंतर टीव्हीके नेतृत्वाने हा वाद कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. विजय यांना पंतप्रधान बनवण्याबाबतची विधाने ही काही आमदारांची वैयक्तिक मते होती, ते त्यांचे वैयक्तिक मत असल्याचं सांगितलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com