CM थलपती विजय दिल्लीत, PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

thalapathy vijay meets pm narendra modi : थलपती विजय दिल्लीत पोहोचले आहेत. या दिल्ली दौऱ्यादरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
thalapathy vijay news
thalapathy vijay meets pm narendra modi saam tv
Published On
Summary

दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग

तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

CM विजय यांनी पंतप्रधानांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

तामिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय हे शपथविधीनंतर पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी दिल्लीला पोहोचले. तामिळनाडूच्या अनेक प्रलंबित मागण्यांची यादी मुख्यमंत्री विजय यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली. यावेळी थलपती विजय यांनी पंतप्रधान मोदी यांच्याशी विकासाच्या मुद्द्यावर चर्चा केली. दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी चर्चा झाली, याची कोणतीही अधिकृत माहिती हाती आलेली नाही. मात्र, दोन्ही नेत्यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय हे शपथविधीनंतर पहिल्यांदा दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांनी दिल्लीतील तामिळनाडू भवनाला भेट दिली. त्यानंतर त्यांनी सायंकाळी साडे चार वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मुख्यमंत्री विजय यांनी पंतप्रधान मोदी यांची विजय सेवा तीर्थ येथे भेट घेतली. या भेटीत दोघांनी २५ मिनिटे चर्चा केली. दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली, याविषयी कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

thalapathy vijay news
तमिळनाडूत राजकीय घडामोडींना वेग; CM विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट, दोघांमध्ये काय चर्चा झाली?

तामिळनाडूच्या राजकारणात थलपती विजय यांनी जोरदार एन्ट्री मारली आहे. विजय यांच्या टीव्हीके पक्षाने पहिल्याच निवडणुकीत सत्ता मिळवली. तामिळनाडूच्या मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी विजय यांना शुभेच्छा दिल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'एक्स'वरून पोस्ट करत मुख्यमंत्री विजय यांना शुभेच्छा दिल्या होत्या.

'थिरु सी. जोसेफ विजय यांना तामिळनाडूच्या मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेण्यासाठी शुभेच्छा. मुख्यमंत्रि‍पदाच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा. केंद्र सरकार हे तमिळनाडू सरकारसोबत समन्वय साधत नागरिकांचं जीवन अधिक चांगले करण्यासाठी काम करत राहील.

thalapathy vijay news
तमिळनाडूचं राजकारण मोक्याच्या क्षणी फिरलं; थलपती विजय यांनी केलं मॅजिक, मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कधी होणार?

तत्पूर्वी, दोन वर्षांपूर्वी थलपती विजय यांनी टीव्हीकेच्या माध्यमातून राजकारणात एन्ट्री केली होती. यंदा झालेल्या निवडणुकीत विजय यांच्या टीव्हीके पक्षाने जोरदार मुसंडी मारली. तामिळनाडूच्या विधान निवडणुकीत टीव्हीके पक्ष बहुमताचा आकडा गाठू शकला नव्हता. त्यानंतर छोट्या पक्षाच्या साथीने टीव्हीके पक्षाने तामिळनाडूत सत्ता स्थापन केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com