भाजपला मोठा धक्का! नितेश राणेंच्या निकटवर्तीय नेत्याचा शेकडो कार्यकर्त्यांसह मनसेत प्रवेश

BJP Leader Join MNS: भाजप युवा मोर्चाचे उत्तर-पश्चिम मुंबई उपनगरचे माजी उपाध्यक्ष दाऊद शेख यांनी भाजपचा राजीनामा देत मनसेमध्ये प्रवेश केलाय. दाऊद शेख यांच्यासोबत भाजप युवा मोर्चातील शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही मनसेचा झेंडा हाती घेतला.
BJP Leader Join MNS
Daud Sheikh quits BJP and joins MNS in Mumbaisaam tv
Published On
Summary
  • दाऊद शेख यांनी भाजप सोडून मनसेमध्ये प्रवेश केल्याची माहिती आहे.

  • दाऊद शेख भाजप युवा मोर्चाचे उत्तर-पश्चिम मुंबई उपनगरचे उपाध्यक्ष होते.

  • दाऊद शेख यांच्यासोबत भाजप युवा मोर्चातील शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केला.

भाजपला अनेक राज्यात धक्क्यांवर धक्के मिळत असून भारतीय जनता पक्षातून मोठी आऊटगोइंग सुरू झालीय. उत्तर प्रदेशानंतर आता मुंबईतही भाजपला मठा धक्का बसलाय. विशेष म्हणजे राज ठाकरेंच्या मनसेनं भाजपचा बडा नेता फोडलाय. मुंबईत भाजप आणि मनसेमधील वाद सुरू असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भाजपला मोठा दणका दिलाय. मंत्री नितेश राणे यांचे निकटवर्तीय दाऊद शेख यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत मनसेत प्रवेश केलाय.

BJP Leader Join MNS
मोठी बातमी! भाजपला मोठा धक्का, तडकाफडकी राजीनामा देत बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश

दाऊद शेख हे भाजप युवक मोर्चाचे उत्तर-पश्चिम मुंबई उपनगरचे उपाध्यक्ष होते. दाऊद शेख यांच्यासह भाजप युवा मोर्चाच्या शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मनसेच्या इंजिनवर स्वार झालेत. मनसे नेते आणि विद्यार्थी सेना प्रमुख अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. त्यामुळे मुंबईतील भाजपच्या युवा संघटनेला मोठे खिंडार पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालीय.

BJP Leader Join MNS
काँग्रेसमध्ये भाकरी फिरणार! राज्य प्रभारींनंतर आणखी १०० नेत्यांची यादी तयार; देशातील नेत्यांना दिल्लीचं बोलावणं

दाऊद शेख हे मंत्री नितेश राणे यांचे निकटवर्तीय मानले जातात. दाऊद शेख यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वासह पक्षातील पदाचा राजीनामा देत मनसेत प्रवेश केलाय. त्यामुळे हा राणेंसाठीही मोठा धक्का असल्याचं म्हटलं जातंय. दाऊद यांच्यासोबत भाजप युवा मोर्चातील शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही मनसेमध्ये प्रवेश केला. अमित ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत या कार्यकर्त्यांनी मनसेची वाट धरलीय.

भाजप-मनसे वादानंतर राजकीय वातावरण तापलं

गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि मनसेमधील संघर्ष चांगलाच वाढलाय. पुण्यातील एका शासकीय महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लावण्यात आलेली प्रतिमा अमित ठाकरे यांच्या सूचनेनुसार हटवण्यात आली होती. या घटनेचा व्हिडिओ आणि माहिती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. यानंतर भारतीय जनता युवा मोर्चाने आक्रमक भूमिका घेत अमित ठाकरे यांचा निषेध केला.

भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी या घटनेविरोधात आंदोलन करत मनसेवर जोरदार टीका केली. पुण्यातील या घटनेचे पडसाद मुंबईतही उमटले. माहीम परिसरात भाजप युवा मोर्चा आणि मनसेचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते. दोन्ही गटांमध्ये जोरदार घोषणाबाजी आणि धक्काबुक्की देखील झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com