जरांगेंच्या आंदोलनादरम्यान सरकारचा मोठा निर्णय; 3 जातींचा ओबीसींमध्ये समावेश

Maharashtra Government Big Decision On OBC : मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारचा ओबीसींबाबत मोठा निर्णय घेतलाय. तीन जातींचा ओबीसींमध्ये समावेश करण्यात येणार आहे.
Maharashtra Government Big Decision On OBC
Maharashtra government decision to include three communities in OBC category amid Jarange protestsaam tv
Published On
Summary
  • राज्य सरकारने ओबीसी प्रवर्गाबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

  • हिंदू वैश्य, हिंदू वाणी आणि हिंदू वैश्य वाणी या तीन जाती एकच असल्याचे सांगत विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांना सूचना

  • ओबीसी मंत्री अतुल सावे यांनी संबंधित जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांना महत्त्वाच्या सूचना

गेल्या काही दिवसापासून आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण चांगलेच तापलेले असतानाच राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मराठा समाजाच्या बांधवांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील उपोषण करत आहेत. जरांगे गेल्या 12 दिवसापासून आंतरवलीत आंदोलन करत आहेत. तर दुसरीकडे ओबीसी समाजाकडून देखील आरक्षणासाठी आंदोलन सुरू केलंय. त्याचदरम्यान राज्य सरकारनं ओबीसींबाबत मोठा निर्णय घेतलाय.

Maharashtra Government Big Decision On OBC
Manoj Jarange Patil: ...तर सरकारचा माज उतरवलाच पाहिजे; मनोज जरांगे पाटील कडाडले

सरकारनं ओबीसीमध्ये अजून तीन जातींची समावेश करण्याचा निर्णय घेतलाय. राज्याचे ओबीसी मंत्री अतुल सावे यांनी विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांना याबाबत सूचना दिल्या आहेत. त्यानुसार आता हिंदू वैश्य, हिंदू वाणी आणि हिंदू वैश्य वाणी या तीनही जाती एकच असल्याचे सांगत त्यांनी विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्यात. या निर्णयामुळे वैश्यवाणी जातीच्या नागरिकांना आता ओबीसी प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सरकारनामाच्या वृत्तानुसार, याआधी वैश्यवाणी समाजातील नागरिकांना ओबीसी प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र मिळण्यास खूप अडचणी येत. हिंदू वैश्य, हिंदू वाणी आणि हिंदू वैश्य वाणी या नावांमुळे जात प्रमाणपत्र आणि जात वैधतेच्या प्रक्रियेत निर्माण होणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी स्पष्ट निर्देश देण्यात आलेत. राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालाचा दाखला देत मंत्री ओबीसी मंत्री अतुल सावे यांनी या तीन जातींचा एकच सामाजिक घटक असल्याचे स्पष्ट केलंय.

Maharashtra Government Big Decision On OBC
मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा मोठा निर्णय; एकाच झटक्यात काढले ४ महत्त्वाचे GR

त्यामुळे संबंधित विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांनी वैश्यवाणी जातीच्या प्रमाणपत्रांच्या प्रकरणांमध्ये आयोगाच्या अहवालाचा विचार करून आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे शिक्षण, सरकारी नोकरी तसेच इतर शासकीय योजनांमध्ये ओबीसी प्रवर्गाच्या आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे. या सरकारच्या निर्णयामुळे आता जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्राच्या प्रक्रियेला मोठी मदत होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com