हायहोल्टेज ड्रामा! अखेर संख्याबळाचा घोळ सुटला, थलपतीचाच 'विजय'; आज शपथविधी

Tamil Nadu Thalapathy Vijay CM Swearing-In Ceremony : तामिळनाडूतील सत्तास्थापनेचा हायहोल्टेज ड्रामा अखेर संपला. मित्रपक्षांचा पाठिंबा मिळवत थलपती विजय यांनी बहुमताचा आकडा पार केला.
Tamil Nadu Government Formation :
Tamil Nadu Government Formation : Saam TV
Published On

Tamil Nadu Government Formation : तामिळनाडूतील सत्तास्थापनेचा पेच अखेर सुटलाय... मित्रपक्षांनीच पाठिंब्याबाबत गोंधळ घातल्यानं थलपती विजय यांना शपथविधीसाठी कशी प्रतीक्षा करावी लागलीय... आणि हायहोल्टेज ड्रामानंतर थलपती विजय यांनी बहुमताचा आकडा कसा गाठलाय... पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून....

थलपती विजय यांची मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीची प्रतीक्षा काही संपायला तयार नाही. कालानंतर पाचव्या दिवशी मोठ्या प्रयत्नांनी थलपतींनी बहुमताचा आकडा जुळवला खरा. मात्र हा आकडा जुळवताना थलपतींना कशी धावपळ करावी लागलीय.. पाहूयात...

4 मे 2026 - विजय थलपती यांचा 108 जागांवर विजय

5 मे 2026 - काँग्रेस आणि डाव्यांचा थलपतींना पाठिंब्याबाबत सकारात्मक चर्चा

6 मे 2026 - थलपती विजय यांनी राज्यपालांची पहिली भेट घेऊन बहुमत असल्याचा दावा केला.

7 मे 2026 - काँग्रेस आणि डाव्यांचा TVK ला पाठिंबा

8 मे 2026 - थलपती विजय यांनी दुसऱ्यांदा राज्यपालांची भेट घेऊन 117 आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र सादर केले...

राज्यपालांना VCK, काँग्रेस, डावे पक्ष, मुस्लीम लीग, AMMK पाठिंबा देत असल्याचं कळवलं

9 मे 2026 - VCK आणि मुस्लीम लीगचे अधिकृत पत्र न आल्यानं शपथविधी रखडला

Tamil Nadu Government Formation :
पंजाबच्या कॅबिनेट मंत्र्यांना ईडीने ठोकल्या बेड्या, १०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

दुसऱ्यांदा शपथविधी रखडल्यानंतरही नाट्यमय घडामोडी सुरू होत्या. राज्यपालांना पत्र सादर करताना AMMK चे एकमेव आमदार कालीचरण पाठिंबा देत असल्याचं थलपती विजय यांनी सांगितलं होतं... मात्र ऐन शपथविधीच्या दिवशी 9 मेला AMMKचे प्रमुख दिनकरन यांनी थलपती विजय यांनी AMMKचे बनावट पत्र दिल्याचा आरोप केला... दिनकरन यांनी राज्यपालांकडे यासंदर्भात तक्रारही केली..मात्र TVK नं कालीचरण यांचे गुप्त बैठकीचे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकून AMMK ची कोंडी केली...त्यामुळे शपथविधीचा खेळ आणखीनच लांबला. तर दुसरीकडे VCK आणि IUML नं अखेर TVK ला अधिकृत पत्र देऊन पाठिंबा जाहीर केला आणि बहुमताचा जादुई आकडाच पार झाला.

थलपती विजय दोन ठिकाणी निवडून आल्यामुळे त्याच्या पक्षाचे 107 आमदार, काँग्रेसचे 5, CPI आणि CPM चे प्रत्येकी 2, VCK आणि मुस्लीम लीगच्या प्रत्येकी 2 आमदारांनंही TVKला पाठिंबा दिला... ज्यामुळे TVKला एकूण 120आमदारांचा पाठिंबा असल्याचं राज्यपालांना सांगून सत्तास्थापनेचा दावा थलपती यांनी केला.

Tamil Nadu Government Formation :
पुण्याला मिळणार आणखी एक महामार्ग, राज्य सरकारने १२०० कोटींच्या प्रकल्पाला दिली मंजुरी, कुठून जाणार हायवे?

तामिळनाडूत विरोधकांनीही TVKची कोंडी करून वेगवेगळ्या शक्यता तपासून पाहिल्या... मात्र पहिल्यांदाच राजकारणाच्या रिंगणात उतरलेल्या थलपती विजय यांनी विरोधकांचे सगळे डावपेच परतवून लावलेत...आधी राज्यपालांनी सरकार स्थापण्याचं निमंत्रण न देणं. नंतर विरोधकांच्या आघाडीची चर्चा आणि त्यानंतर मित्रपक्षांकडूनच पाठिंब्याबाबत झाळेला गोंधळ हे सारं थलपती विजय यांच्या सिनेमापेक्षा कमी नव्हतं...त्यामुळे सिनेमात जसे क्लायमॅक्स आणि अॅन्टीक्लायमॅक्स असतात तसे प्रत्यक्षातील राजकारणातही असतात याचा अनुभव विजय यांना कारकीर्दीच्या सुरूवातीलाच घ्यावा लागला..ही तर सुरूवात आहे...पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त.

ब्युरो रिपोर्ट, साम टिव्ही न्यूज

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com