संजय यांच्या घरी बैठकींचा धडाका; आमदार-खासदारांची गर्दी, राज्याला नवा मुख्यमंत्री, राजकारणात खळबळ

Nishant Kumar Entry Into Bihar Politics: बिहारमध्ये मोठी राजकीय घडामोड घडण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार राज्यसभेवर जाणार असल्याची चर्चा असून त्यांचा मुलगा निशांत कुमार लवकरच राजकारणात प्रवेश करणार आहे.
JDU leaders, MLAs and MPs gather at Sanjay Jha’s residence as speculation grows over Nishant Kumar’s political entry and Bihar’s next Chief Minister
JDU leaders, MLAs and MPs gather at Sanjay Jha’s residence as speculation grows over Nishant Kumar’s political entry and Bihar’s next Chief MinisterSaam Tv
Published On

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा मुलगा लवकरच राजकरणात प्रवेश करणार आहे. नितीश कुमार हे राज्यसभेवर जाणार असल्याने बिहारच्या मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. आता मिळालेल्या माहितीनुसार नितीश यांचा मुलगा निशांत हे जनता दलाचे कार्यकारी अध्यक्ष संजय झा यांच्या निवासस्थानी पोहोचले आहे. याठिकाणी ते सर्व जिल्हाध्यक्षाशी चर्चा करत आहे. त्याआधी त्यांनी आज सकाळी JDU च्या प्रमुख लोकांशी चर्चा केली होती. ही बैठक देखील संजय झा यांच्या निवासस्थानी पार पडली. यावेळी या बैठकीला पक्षाचे आमदार, खासदार आणि मंत्री उपस्थित होते.

JDU leaders, MLAs and MPs gather at Sanjay Jha’s residence as speculation grows over Nishant Kumar’s political entry and Bihar’s next Chief Minister
Shocking : बॉयफ्रेंडच निघाला हैवान; उसाच्या शेतात नेत ८ वीच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार, अत्याचारानंतर पीडितेसोबत केलं भयंकर

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निशांत कुमार रविवारी दुपारपर्यंत पक्षात प्रवेश करतील. संजय झा यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत मंत्री श्रवण कुमार, आमदार संजय गांधी, चेतन आनंद, कोमल सिंह, समृद्ध वर्मा आणि ललन सराफ यांच्या समवेत अनेत पक्षाचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते.

JDU leaders, MLAs and MPs gather at Sanjay Jha’s residence as speculation grows over Nishant Kumar’s political entry and Bihar’s next Chief Minister
DCM Plane News : उपमुख्यमंत्री मौर्य यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग, केबिनमध्ये धुराचे लोट अन्...

नितीश राज्यसभेवर अन् निशांत राज्याच्या राजकारणात

मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दोन दिवसांपूर्वी राज्यसभा उमेदवारीचा अर्ज दाखल केला होता. शुक्रवारी झालेल्या जेडीयूच्या बैठकीत निशांत यांना राजकारणात आणले जावे अशी मागणी केली गेली. यानंतर निशांत हे औपचारिकरित्या राजकरणार येणार यावर शिक्कामोर्तब झाला. राज्यसभा खासदार झाल्यानंतर नितीश कुमार हे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतील.

JDU leaders, MLAs and MPs gather at Sanjay Jha’s residence as speculation grows over Nishant Kumar’s political entry and Bihar’s next Chief Minister
Vladimir Putin : अमेरिकाविरोधात रशियाचा इराणला जाहीर पाठिंबा, व्लादिमीर पुतीन म्हणाले...

तसेच मुख्यमंत्रीपद हे भाजपकडे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. निशांत हे उपमुख्यमंत्री बनू शकता असे सांगितले जात आहे. मात्र अधिकृतरित्या अद्याप कुठलाही निर्णय झाला नसल्याचे पक्षाने सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com