Shocking : बॉयफ्रेंडच निघाला हैवान; उसाच्या शेतात नेत ८ वीच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार, अत्याचारानंतर पीडितेसोबत केलं भयंकर

Bihar Crime News : बिहारमध्ये ८ वीच्या विद्यार्थिनीवर तिच्याच बॉयफ्रेंडने आणि त्याच्या मित्राने मिळून सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर तिची हत्या देखील करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस तपास करत असून संबंधित आरोपी फरार आहेत.
Shocking : बॉयफ्रेंडच निघाला हैवान;  उसाच्या शेतात नेत ८ वीच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार, अत्याचारानंतर पीडितेसोबत केलं भयंकर
Bihar Crime NewsSaam Tv
Published On
Summary
  • ८ वीच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार

  • एकाच वर्गात शिकणारी बॉयफ्रेंडनेच केलं घाणेरडं कृत्य

  • बलात्कारानंतर मुलीची हत्या करण्यात आली

  • आरोपी फरार

Bihar 8th Standerd Girl Gang Rape And Murder Purnia बिहारमध्ये ८ वीत शिकणाऱ्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे तिचा मृतदेह बांबूच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला. घटनेनंतर आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढला असून पोलीस तपास सुरु आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुलीच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना बिहारमधील पूर्णिया येथे घडली आहे. पीडित मुलीच्या घरी होळीच्या दिवशी जय्यत तयारी सुरु होती. तिने त्याच्यासाठी किराणा सामानाची यादी देखील तयारी केली. यादरम्यान तिच्या आईने तिला चहा बनवण्यासाठी सांगितला, मात्र मुलीने आईला मी बाहेर जाते परत येईन असं सांगितलं. परंतु संध्याकाळ झाली तरी मुलगी घरी परतली नाही.

Shocking : बॉयफ्रेंडच निघाला हैवान;  उसाच्या शेतात नेत ८ वीच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार, अत्याचारानंतर पीडितेसोबत केलं भयंकर
Parbhani : पोलीस दलात खळबळ! परभणीत हवालदाराला लाच घेताना रंगे हाथ पकडलं

कुटुंबीयांनी देखील तिचा शोध घेतला मात्र ती कुठेच सापडली नाही. त्यानंतर कुटुंबीयांनी मुलीचा मोबाईल तपासला. तिच्या फोनवर शेवटचा कॉल आलेल्या मुलाच्या नंबरवर संपर्क साधला. मात्र तो बंद लागला, म्हणून मुलीच्या कुटुंबीयांनी त्याच्या घरी धाव घेतली. यावेळेस पीडित मुलीच्या वर्गात शिकणारा मुलगा घरात होता. मुलीच्या आई वडिलांनी त्याच्याकडे चौकशी केली मात्र त्याने काहीच सांगितलं.

Shocking : बॉयफ्रेंडच निघाला हैवान;  उसाच्या शेतात नेत ८ वीच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार, अत्याचारानंतर पीडितेसोबत केलं भयंकर
Shocking : पालकांनो सावधान! ऑटोमॅटिक लॉकमुळे एक वर्षाचा चिमुकला खोलीत अडकला; अशी झाली सुटका, पाहा Video

थोडा दबाव टाकल्यावर मुलाने सांगितले की तो मृत मुलीशी दोन वर्षांपासून प्रेमसंबंधात होता. घटनेच्या दिवशी तो त्याच्या मित्रांसोबत एका मक्याच्या शेतात दारू पित होता. त्याचवळी त्याने मुलीला मक्याच्या शेतात बोलावले. ती येताच तो तिच्यासोबत झुडुपाकडे गेला, पण थोड्याच वेळात त्याचे मित्रही तिथे पोचले. त्यांनी तिला धमकावले आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. पीडितेने तिथून पळ काढताना आरोपींना तिच्या कुटुंबाला सांगण्याची धमकी दिली.

Shocking : बॉयफ्रेंडच निघाला हैवान;  उसाच्या शेतात नेत ८ वीच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार, अत्याचारानंतर पीडितेसोबत केलं भयंकर
Government Scheme : तिसरं अपत्य झाल्यास सरकार देणार २५,००० रुपये; या राज्याने घेतला निर्णय, वाचा नेमकी योजना काय आहे?

मुलांनी घाबरून तिचा स्कार्फ आणि हातांनी गळा दाबून हत्या केली. हत्येनंतर, त्यांनी तिचा मृतदेह जवळच्या बांबूच्या झुडुपात लटकवला जेणेकरून ती आत्महत्या आहे असे भासेल.गावकऱ्यांनी आरोपी आरोपीला एका घरात बंद केले आणि पोलिसांना माहिती दिली. परंतु आरोपी मुलगा बंद घरात शिडी वापरून पळून जाण्यात यशस्वी झाला.पोलीस आरोपीचा शोध घेत असून या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com