Government Scheme : तिसरं अपत्य झाल्यास सरकार देणार २५,००० रुपये; या राज्याने घेतला निर्णय, वाचा नेमकी योजना काय आहे?

Andhra Pradesh Government Scheme : आंध्र प्रदेश सरकारने घटत्या जन्मदराच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतला आहे. तिसरं अपत्य झाल्यास कुटुंबांना २५ हजार रुपयांचे प्रोत्साहन देण्याची घोषणा मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केली आहे.
Government Scheme : तिसरं अपत्य झाल्यास सरकार देणार २५,००० रुपये; या राज्याने घेतला निर्णय, वाचा नेमकी योजना काय आहे?
Andhra Pradesh Government SchemeSaam Tv
Published On
Summary
  • आंध्र प्रदेश सरकारने नवीन लोकसंख्या व्यवस्थापन धोरण सादर केले

  • दोनपेक्षा जास्त अपत्य असणाऱ्या कुटुंबांना २५ हजार रुपये

  • राज्याचा प्रजनन दर १.५ पर्यंत खाली आला

  • भविष्यात मोठी समस्या टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला

पालकांसाठी महत्त्वाची बातमी! तुम्हाला देखील २ पेक्षा जास्त अपत्य असतील तर, तुम्हाला शासनाकडून २५ हजार रुपये मिळणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री यांनी केली आहे. घटत्या जन्मदराला चालना देण्यासाठी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. विधानसभेत राज्याचे नवीन लोकसंख्या व्यवस्थापन धोरण सादर करताना त्यांनी ही घोषणा केली.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी विधानसभेत राज्याचे नवीन 'लोकसंख्या व्यवस्थापन धोरण' मांडले. राज्याचा प्रजनन दर १.५ पर्यंत खाली घसरल्याने नायडू यांनी चिंता व्यक्त केली. लोकसंख्येचा समतोल राखण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. ज्या कुटुंबात दोन आणि त्यापेक्षा अधिक मुलं जन्माला येतील, अशा स्त्रियांना प्रसूतीच्या कालावधीत सरकारकडून २५,००० रुपये प्रोत्साहन म्हणून देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

Government Scheme : तिसरं अपत्य झाल्यास सरकार देणार २५,००० रुपये; या राज्याने घेतला निर्णय, वाचा नेमकी योजना काय आहे?
Shcoking : धक्कादायक! १६ वर्षीय मुलीकडून बाळाला जन्म; अर्भक कचऱ्याच्या डब्यात टाकून काढला पळ

राज्यात जन्मदर कमी झाल्यामुळे भविष्यात तरुणांची संख्या घटून वृद्धांची लोकसंख्या वाढण्याची भीती नायडू यांनी व्यक्त केली आहे. याचा थेट परिणाम राज्याच्या अर्थव्यवस्थेवर आणि मनुष्यबळावर होणार आहे. दक्षिण भारतातील राज्यांची लोकसंख्या अशीच कमी होत राहिली, तर भविष्यात लोकसभेतील प्रतिनिधित्वही कमी होऊ शकते, असा इशारा त्यांनी दिला.

Government Scheme : तिसरं अपत्य झाल्यास सरकार देणार २५,००० रुपये; या राज्याने घेतला निर्णय, वाचा नेमकी योजना काय आहे?
Shocking : पालकांनो सावधान! ऑटोमॅटिक लॉकमुळे एक वर्षाचा चिमुकला खोलीत अडकला; अशी झाली सुटका, पाहा Video

आकडेवारीनुसार, राज्यातील ५८% कुटुंबांमध्ये सध्या केवळ एकच मूल आहे. मुख्यमंत्री नायडू म्हणाले की, राज्याचा विकास टिकवून ठेवण्यासाठी तरुणांची गरज आहे. जर जन्मदर वाढला नाही, तर शेती आणि उद्योगांसाठी कामगार मिळणार नसल्याची खंत त्यांनी यावेळी त्यांनी व्यक्त केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com