Shocking : पालकांनो सावधान! ऑटोमॅटिक लॉकमुळे एक वर्षाचा चिमुकला खोलीत अडकला; अशी झाली सुटका, पाहा Video

Nanded Hanumangad News : नांदेडमध्ये ऑटोमॅटिक लॉक असलेल्या दरवाजामुळे एक वर्षाचा चिमुकला खोलीत अडकला होता. तब्ब्लक एक तासानंतर अग्निशमन दलाने बाळाची सुखरूप सुटका केली.
Shocking : पालकांनो सावधान! ऑटोमॅटिक लॉकमुळे एक वर्षाचा चिमुकला खोलीत अडकला; अशी झाली सुटका, पाहा Video
Nanded Hanumangad NewsSaam Tv
Published On
Summary
  • नांदेडमध्ये एक वर्षाचा चिमुकला खोलीत अडकला

  • ऑटोमॅटिक लॉक असलेल्या दरवाजामुळे घटना घडली

  • जवळपास तासभर बाळ खोलीत एकटे होते

  • अग्निशमन दलाने तात्काळ कारवाई करून बाळाची सुटका केली

सागर सूर्यवंशी, नांदेड

पालकांनो सावधान! तुम्ही देखील मुलांना खोलीत एकटं सोडत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी. नांदेडमध्ये ऑटोमॅटिक लॉक असलेला रूमचा दरवाजा बंद झाल्याने खोलीत एकटाच असलेला एक वर्षाचा मुलगा अडकला. यानंतर अग्निशमन दलाच्या मदतीने तासाभरानंतर बाळाला खोलीतून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नांदेडच्या हनुमानगड मधील वृंदावन निवास या इमारतीत पहिल्या मजल्यावर कंकरे कुटुंब राहते. कंकरे यांचा एक वर्षाचा मुलगा शिवांश आणि त्याची आई घरी होते. आई घरातच एका रुममध्ये असताना बाळ दुसऱ्या रुममध्ये खेळत होते. तेव्हा अचानक रुमचा दरवाजा ढकलला जाऊन दरवाजा लॉक झाला.

Shocking : पालकांनो सावधान! ऑटोमॅटिक लॉकमुळे एक वर्षाचा चिमुकला खोलीत अडकला; अशी झाली सुटका, पाहा Video
Latur : अल्पवयीन मुलीला जनावरांच्या गोठ्यात नेलं, मांडीवर बसवून नको ते केलं; लातूरमधील धक्कादायक घटना

शिवांश रुममध्ये एकटा अडकला. बाळाच्या वडिलांनी आणि शेजारच्यांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला पण दरवाजा उघडला नाही. अखेर अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाने तात्काळ पोहोचून मदतकार्य सुरु केले.

घराच्या पाठीमागे जाऊन सीडीवरून खिडकीतून फायर हुक टाकून दरवाजा उघडण्यात आला. जवळपास तासभर हा चिमुकला रुममध्ये एकटा खेळत होता. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com