Parbhani : पोलीस दलात खळबळ! परभणीत हवालदाराला लाच घेताना रंगे हाथ पकडलं

Parbhani Police Constable Bhagwan Mundhe Bribe : परभणी जिल्ह्यातील सोनपेठ पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार भगवान मुंढे यांना अर्जावर कारवाई करण्यासाठी ८ हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडले. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून पुढील तपास सुरू आहे.
Parbhani : पोलीस दलात खळबळ! परभणीत हवालदाराला लाच घेताना रंगे हाथ पकडलं
Parbhani Police Constable Bhagwan Mundhe Bribe NewsSaam Tv
Published On
Summary
  • परभणीत पोलीस हवालदाराला ८ हजारांची लाच घेताना पकडलं

  • सोनपेठ पोलीस ठाण्यातील भगवान मुंढे यांच्यावर कारवाई

  • गोशाळा वादाच्या अर्जावर कारवाईसाठी लाच मागितल्याचा आरोप

  • पुढील तपास सुरू

Parbhani Police Constable Bhagwan Mundhe Bribe नाशिकमध्ये जीएसटी अधिकाऱ्यांना लाखोंची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आल्याची घटना ताजी असतानाच परभणीत एका पोलीस हवालदाराला देखील लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. अर्जावर कारवाई करण्यासाठी ही लाच घेतल्याचे समोर आले आहे. यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, परभणी जिल्ह्यातील सोनपेठ पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार भगवान मुंढे कार्यरत आहेत. गंगाखेड येथील ७० वर्षीय तक्रारदार यांनी सांगितले गोशाळेतील वादाच्या अर्जावर कारवाई करण्यासाठी पोलीस हवालदार भगवान मुंढे यांनी १० हजार रुपयांची लाच मागितली होती.

Parbhani : पोलीस दलात खळबळ! परभणीत हवालदाराला लाच घेताना रंगे हाथ पकडलं
Railway News : वेळ संपली, काम बंद! ड्युटी संपल्यानंतर लोको पायलटने ट्रेन थांबवली अन् निघून गेला, ३ तास प्रवाशांचा खोळंबा

पडताळणी दरम्यान तडजोडीअंती ८ हजार रुपये देण्याचे ठरले. याप्रकरणी तक्रारदाराने पोलिसांना माहिती दिली. यानंतर गंगाखेड-परळी रोडवरील निळा फाटा येथील विश्व लक्ष्मी रसवंती गृह येथे पोलिसांनी सापळा रचला. यावेळी मुंढे यांनी पंचासमक्ष तक्रारदाराकडून ८ हजार रुपयांची लाच स्वीकारली.

Parbhani : पोलीस दलात खळबळ! परभणीत हवालदाराला लाच घेताना रंगे हाथ पकडलं
Government Scheme : तिसरं अपत्य झाल्यास सरकार देणार २५,००० रुपये; या राज्याने घेतला निर्णय, वाचा नेमकी योजना काय आहे?

यावेळेस सापळा लावलेल्या एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले. या कारवाईत हवालदाराकडून मोबाईल, ओळखपत्र व रोख रक्कम जप्त करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक राहुल तरकसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com