Railway News : वेळ संपली, काम बंद! ड्युटी संपल्यानंतर लोको पायलटने ट्रेन थांबवली अन् निघून गेला, ३ तास प्रवाशांचा खोळंबा

Bihar Thakurganj Railway Station News : बिहारमधील ठाकूरगंज रेल्वे स्थानकावर ड्युटी संपल्याचे कारण देत लोको पायलटने ट्रेन पुढे नेण्यास नकार दिल्याने मालदाहून सिलीगुडीकडे जाणारी डेमू ट्रेन तब्बल तीन तास अडकून पडली. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Railway News : वेळ संपली, काम बंद! ड्युटी संपल्यानंतर  लोको पायलटने ट्रेन थांबवली अन् निघून गेला, ३ तास प्रवाशांचा खोळंबा
Bihar Thakurganj Railway Station NewsSaam Tv
Published On
Summary
  • बिहारमधील ठाकूरगंज रेल्वे स्थानकावर ट्रेन तीन तास अडकली

  • लोको पायलटने ड्युटी संपल्याचे कारण देत ट्रेन चालवण्यास नकार दिला

  • मालदाहून सिलीगुडीकडे जाणारी डेमू ट्रेन होती

  • प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला

Bihar Thakurganj Railway Station Demu Train Stuck ऑफिसमध्ये काम करताना कार्यलयीन वेळा पाळल्या जातात. ड्युटी संपली की कर्मचारी घरचा रस्ता पकडतात. मात्र एका लोको पायलटने देखील हा नियम अगदी काटेकोरपणे पाळला आणि ड्युटी संपताच ट्रेन अर्ध्या वाटेवर सोडून सुरक्षेचं कारण देत ट्रेन पुढे न घेऊन जाण्याचा निर्णय घेतला . यामुळे ट्रेन एका जागी तीन तास अडकून होती. पायलटच्या या कृतीने प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले. सदर घटना बिहारच्या ठाकूरगंज रेल्वेस्थानकात घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी ठाकूरगंज रेल्वे स्थानकावर मालदाहून सिलिगुडीला जाणारी डेमू ट्रेन (क्रमांक ७५७१९) दुपारी २:५२ वाजता सुरू होऊन प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर जवळजवळ तीन तास अडकून पडली. मालदाहून ट्रेन वेळापत्रकानुसार निघाली, परंतु ठाकूरगंजला पोहोचल्यानंतर ड्रायव्हरने स्टेशन मास्टरला कळवले की त्याची नऊ तासांची ड्युटी पूर्ण झाली आहे.

Railway News : वेळ संपली, काम बंद! ड्युटी संपल्यानंतर  लोको पायलटने ट्रेन थांबवली अन् निघून गेला, ३ तास प्रवाशांचा खोळंबा
Afghanistan Pakistan War : पाकिस्तानवर एअरस्ट्राइक! नूर खान बेसवर अफगाणिस्तानचा शक्तिशाली हल्ला, फोटो अन् व्हिडिओ आले समोर

रेल्वे सुरक्षा नियमांच कारण देत, लोको पायलटने सांगितले की ट्रेन नियोजित वेळेपेक्षा जास्त चालवल्याने सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. तब्बल तीन तास ट्रेन अडकून पडल्याने प्रवाशांचा संयम संपला. ट्रेनमध्ये व्यापारी, रोजंदारी कामगार आणि लहान मुलांसह कुटुंबे सिलीगुडी आणि किशनगंजला जात होती. प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त केला.

Railway News : वेळ संपली, काम बंद! ड्युटी संपल्यानंतर  लोको पायलटने ट्रेन थांबवली अन् निघून गेला, ३ तास प्रवाशांचा खोळंबा
Gadchiroli : धक्कादायक! सरकारी रूग्णालयात ११ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, कुटुंबियांचा डॉक्टरांवर आरोप, गडचिरोलीत नेमकं काय झालं?

रेल्वेचा नियम काय आहे?

रेल्वे नियमांनुसार, ट्रेन सुरक्षितरित्या चालवण्यासाठी लोको पायलट एका वेळी ९ ते १० तास काम करतो. तथापि, आवश्यक असल्यास हे तास वाढवता येतात. कधीकधी ड्युटीचे तास फक्त ४ तास असतात, तर इतर वेळी ते ९ तासांपर्यंत वाढू शकतात. निर्धारित वेळेपेक्षा जास्त काम करणे ओव्हरटाईम मानले जाते आणि त्याचे गळे पैसे दिले जातात. प्रवासी गाड्यांमध्ये लोको पायलट शिफ्ट साधारणपणे आठ तासांपेक्षा जास्त वेळ घेत नाहीत. म्हणून काही ठिकाणी आठ तासांनंतर लोको पायलट बदलला जातो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com