DCM Plane News : उपमुख्यमंत्री मौर्य यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग, केबिनमध्ये धुराचे लोट अन्...

Uttar Pradesh DCM Plane Emergency Landing : उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या हेलिकॉप्टरमध्ये हवेत तांत्रिक बिघाड आढळल्याने लखनौमधील चौधरी चरण सिंह आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
DCM Plane News : उपमुख्यमंत्री मौर्य यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग, केबिनमध्ये धुराचे लोट अन्...
Uttar Pradesh DCM Plane Emergency LandingSaam Tv
Published On
Summary
  • यूपीचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड

  • हेलिकॉप्टरचे लखनौ विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले

  • मौर्य हे लखनौहून कौशांबी दौऱ्यावर जात होते

  • सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही

उत्तर प्रदेशमधून मोठी बातमी समोर आली आहे. हवेत तांत्रिक बिघाड आढळून आल्यामुळे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या हेलिकॉप्टरला लखनौमधील चौधरी चरण सिंह आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले. मौर्य हे लखनौहून कौशांबीला एका कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी हेलिकॉप्टरने प्रवास करत असताना त्यांच्या हेलिकॉप्टरमधून धूर आल्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव लँडिंग करण्यात आलं.

मिळालेल्या माहितीनुसार, मौर्य सकाळी ११:३० वाजता कौशांबी येथील शीतला देवी अतिथीगृहाजवळील सारस महोत्सवाच्या उद्घटनासाठी जाणार होते. तसेच तिकडच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार होते. मात्र कौशांबी येथील कार्यक्रमासाठी मौर्य निघाले असता त्यांच्या उड्डाणादरम्यान अचानक हेलिकॉप्टरमध्ये धुराचे लोट येऊ लागले.

DCM Plane News : उपमुख्यमंत्री मौर्य यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग, केबिनमध्ये धुराचे लोट अन्...
Gadchiroli : धक्कादायक! सरकारी रूग्णालयात ११ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, कुटुंबियांचा डॉक्टरांवर आरोप, गडचिरोलीत नेमकं काय झालं?

सुरक्षिततेच्या कारणास्तव पायलटने तातडीने विमान लखनऊकडे वळवले आणि विमानतळावर सुरक्षितपणे उतरवले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नसून उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि हेलिकॉप्टरमधील इतर सर्वजण सुरक्षित असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. तसेच हेलिकॉप्टरमधील बिघाडाचे नेमके कारण शोधण्यासाठी अधिकारी आता हेलिकॉप्टरची तपासणी करणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com