Vidhan Sabha Rada : विधानसभेत राडा! ठाकरे-भाजपचे आमदार भिडले, एकमेकांचा बाप काढला

BJP vs Shiv Sen : महाराष्ट्र विधानसभा अधिवेशनात भाजपचे सचिन कल्याण शेट्टी आणि शिवसेना (UBT) चे भास्कर जाधव यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली. राज्यपालांच्या भाषणावरून सुरू झालेला वाद ‘बाप काढला’ या वक्तव्यामुळे अधिकच तापला.
Sachin Kalyan Shetty vs Bhaskar Jadhav
Sachin Kalyan Shetty vs Bhaskar Jadhav Saam TV
Published On

Sachin Kalyan Shetty vs Bhaskar Jadhav : विधानसभा अधिवेशनात आमदारांमध्येच राडा पाहायला मिळाला. भाजपचे सोलापूरमधील आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे कोकणातील आमदार भास्कर जाधव यांच्यामध्ये विधानसभेत जोरदार भांडणं झाली. दोन्ही नेत्यांमध्ये कोणत्या कारणामुळे वाद झाला? याबाबतची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण दोन्ही नेत्यांनी बाप काढल्याचे व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे. दोन आमदारांचा विधानसभेतील वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विधानसभा पोर्चमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये संवाद सुरू होता. त्यावेळी अचानक वादाची ठिणगी पडली. यावेळी बोलताना भास्कर जाधव यांची जीभ घसरली आणि त्यांनी 'बापाचा' उल्लेख केल्याने विधिमंडळातील वातावरण अधिकच तापले. आपल्या वडिलांविषयी काढलेल्या उद्गारांमुळे आमदार कल्याणशेट्टी प्रचंड आक्रमक झाले होते. त्यांनी तातडीने जाधवांना प्रत्युत्तर दिले, ज्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये तू तू मैं मैं झाले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पाहा व्हिडिओ....

भाजपाचे सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोटचे आमदार सचिन कल्यणाशेट्टी आणि उबाठा ज्येष्ठ आमदार भास्कर जाधव यांच्यात विधानसभेत शाब्दिक चकमक झाली. राज्यपालांच्या भाषणावरून दोन्ही नेत्यांमध्ये तू तू मैं मैं झाल्याचे व्हिडिओत दिसत आहे. आम्ही काही चुकीचं केले नाही, असे भास्कर जाधव म्हणाल्याचे व्हिडिओत दिसतेय. तर सचिन कल्याण शेट्टी म्हणाले आम्ही सत्ताधारी पक्षाचे आमदार आहोत. आमचा बाप कशाला काढला? त्यावर भास्कर जाधव म्हणाले, असू द्या.. आणखी २ मंत्री आले तर मी घाबरत नाही. हे काम सरकारी नोकर कसे करू शकतात, असे ते म्हणाल्याचे दिसतेय.

Sachin Kalyan Shetty vs Bhaskar Jadhav
Thackeray Brothers : ठाकरे बंधुंमध्ये पुन्हा बिनसलं? राज ठाकरेंनी नाकारला उद्धव ठाकरेंचा प्रस्ताव; राजकारणात मोठी खळबळ

भास्कर जाधव आणि कल्याण शेट्टी या आमदारांच्या हमरातुमरीमुळे विधिमंडळ पोर्च परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर उपस्थित इतर लोकांनी मध्यस्थी करत दोन्ही नेत्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. भास्कर जाधव घटनास्थळावरून निघून गेले. पण या प्रकारामुळे विधिमंडळात राडा होण्याची शक्यता आहे. भास्कर जाधव या प्रकारावर काय बोलणार? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी कोणत्या कारणामुळे भांडणं लागली होती, हे अद्याप समोर आलेले नाही.

Sachin Kalyan Shetty vs Bhaskar Jadhav
Gold Rate Today : सराफा बाजार उघडताच सोनं झालं स्वस्त, प्रति तोळा इतक्या रूपयांवर आले, वाचा 22, 24 कॅरेट गोल्डची किंमत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com