Shivsena UBT Vs MNS : मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग समिती निवडणुकीत आता मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळतेय. प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी आज अर्ज भरले जात असतानाच, मनसेनं या निवडणुकीत 'तटस्थ' राहण्याचा निर्णय घेतलाय. उद्धव ठाकरेंनी दिलेला प्रभाग समिती अध्यक्षाचा प्रस्ताव राज ठाकरेंनी नाकारलाय. स्वीकृत नगरसेवक पदावरून ठाकरेसेनेनं मनसेची अपेक्षा पूर्ण न केल्याने राज ठाकरेंनी नाराजी व्यक्त केलीय. या निर्णयामुळे प्रभाग समिती निवडणुकीत ठाकरेसेनेची डोकेदुखी वाढण्याची शक्यता निर्माण झालीय. त्यामुळे मुंबईच्या राजकारणात नवी खळबळ उडालीय...
या संघर्षाचे मुख्य कारण 'स्वीकृत नगरसेवक' पदावरून असल्याचे समोर येत आहे. मनसेने अपेक्षित धरलेली मदत ठाकरे गटाकडून पूर्ण न झाल्याने राज ठाकरे यांनी आपली नाराजी कृतीतून व्यक्त केल्याचे बोलले जात आहे. मनसेच्या या 'तटस्थ' भूमिकेमुळे शिवसेना (UBT) ची डोकेदुखी प्रचंड वाढली आहे. प्रभाग समिती निवडणुकीत बहुमतासाठी प्रत्येक मत महत्त्वाचे असताना, मनसेने घेतलेल्या या भूमिकेमुळे ठाकरे गटाच्या उमेदवारांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. या निर्णयामुळे मुंबईच्या राजकारणात नवी खळबळ उडाली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.