Bihar Election Result

बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल शुक्रवारी, १४ नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे. आरजेडी (राष्ट्रीय जनता दल), काँग्रेसच्या नेतृत्वातील महागठबंधन (इंडिया आघाडी) आणि भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए (राष्ट्रीय लोकशाही आघाडी) यांच्यात चुरस आहे. इंडिया आघाडीकडून राहुल गांधी, प्रियांका गांधी, तेजस्वी यादव यांच्या सभा झाल्या. तर एनडीएकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच केंद्रातील महत्वाचे नेते निवडणुकीच्या प्रचार रिंगणात उतरले होते. या निवडणुकीत प्रचाराच्या केंद्रस्थानी विकास, रोजगार, शिक्षण, कायदा-सुव्यवस्था आणि स्थानिक मुद्दे होते. नीतीश कुमार यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या मतदारसंघांमध्येही मोठी चुरस पाहायला मिळत आहे. बिहारच्या जनतेचे लक्ष या निवडणुकीच्या निकालाकडे लागले आहे. कोणत्या पक्षाची सत्ता येणार, मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
Read More
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com