प्रेमा तुझा रंग कसा! जावयासोबत पळून गेलेली सासू आता बहिणीच्या नवऱ्यासोबत फरार

Mother In Law Elopes With Brother In Law In India: जावयासोबत पळून गेलेली सासू पुन्हा एकदा चर्चेत. यावेळी मेहुण्यासोबत फरार होताना रोख रक्कम व दागिने नेल्याचा आरोप. पोलिस तपास सुरू.
Representative image of a shocking family elopement case under police investigation.
Representative image of a shocking family elopement case under police investigation.Saam Tv
Published On

जसा काळ बदलत चालला आहे तसे प्रेमाची व्याख्याही बदलत चालली आहे, खरंतर, आम्ही हे यासाठी असे म्हणत आहोत कारण १० महिन्यांपूर्वी घर सोडून जावयाकडे राहण्यासाठी निघालेली सासूची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. पण यावेळी, फरक एवढाच आहे की तिच्या जावयाच्या ऐवजी, ती महिला तिच्याच मेहुण्याच्या प्रेमात पडली आहे.त्याच्यासोबत पळून जाण्यापूर्वी, महिलेने मोठा प्लॅन केला महिलेने तिच्या मेहुण्यासोबत पळून जाण्यापूर्वी सुमारे 2 लाख रुपये आणि दागिने सोबत घेतले होते.

Representative image of a shocking family elopement case under police investigation.
Bangladesh Election 2026: बांगलादेशमध्ये BNP चा मोठा विजय, तारिक रहमान होणार पंतप्रधान; कोण आहेत?

पोलिसांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली आहे. पोलिस सध्या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. सदर महिलेचे नाव ही सपना आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. सपना गेल्या वर्षी एप्रिलमध्ये तिच्या जावयासोबत पळून गेली होती. सपना तिच्या जावयासोबत राहण्यासाठी घर सोडून गेली होती. त्यावेळी सपना तिचा जावई राहुलसोबत राहण्यासाठी बिहारमधील सीतामढी येथे गेली. दोघेही जवळपास एक वर्ष एकत्र राहत होते. आता, राहुलचा आरोप आहे की सपना त्याला सोडून ६ फेब्रुवारी रोजी गंगिरी येथील रहिवासी असलेल्या तिच्या मेहुण्यासोबत पळून गेली.

Representative image of a shocking family elopement case under police investigation.
एफआयआर करा किंवा विशेषाधिकार प्रस्ताव आणा, मी घाबरणार नाही; राहुल गांधी मोदी सरकारवर भडकले

राहुलने या घटनेबाबत पोलिस तक्रार दाखल केली आहे. त्याच्या तक्रारीत त्याने सपना अंदाजे 2 लाख रुपये आणि दागिने घेऊन पळून गेल्याचा आरोप केला आहे. मात्र राहुलच्या तक्रारीनंतरही पोलिसांनी अजुनही गुन्हा दाखल केलेला नाही. दरम्यान, सपनाच्या पहिल्या पतीने अलीकडेच दुसरे लग्न केल्याचे वृत्त समोर येत आहे.

Representative image of a shocking family elopement case under police investigation.
Crime News : धक्कादायक! कॉलेजच्या विद्यार्थिनीसोबत भयंकर घडलं; ११ महिन्यांत ३० वेळा बलात्कार

गेल्या वर्षी उत्तर प्रदेशमधील अलीगढमध्ये खळबळ उडवून टाकणारी बातमी आली होती की, मुलीची आई तिच्या मुलीच्या लग्नामध्ये नवरदेवासोबत पळून गेली यावेळी तिची मुलगी चक्रवलीच. अलीगढ जिल्ह्यातील मद्रक पोलिस स्टेशन परिसरातील ही घटना देशभरात चर्चेचा विषय बनली होती. सासू सपना आणि जावई राहुल यांनी शेवटपर्यंत एकमेकांसोबत राहू अशी शपथ घेतली होती. यावेळी तिच्या नवऱ्याने आणि मुलांनी तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. सपनाने सर्वांना सांगितले की केले की ती आता राहुलची आहे आणि घरी परतणार नाही. आता दोघेही कोर्ट मॅरेज करणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com