दिल्लीतील आंदोलनात महाराष्ट्रातील दोन दिग्गज नेत्यांना अटक; राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

Raju Shetti Mahadev Jankar Detained Delhi Farmers Protest: दिल्लीतील भारत-अमेरिका व्यापार कराराविरोधातील आंदोलनात महाराष्ट्रातील राजू शेट्टी, महादेव जानकर यांच्यासह हजारो शेतकऱ्यांना अटक. देशभरातून संताप व्यक्त.
Farmers and leaders being detained by Delhi Police during protest against the proposed India-US trade deal at Rajghat.
Farmers and leaders being detained by Delhi Police during protest against the proposed India-US trade deal at Rajghat.saam tv
Published On

सागर आव्हाड, साम टीव्ही

भारत आणि अमेरिका यांच्यात होणाऱ्या प्रस्तावित 'मुक्त व्यापार करारा'ला (India-US Trade Deal) विरोध करण्यासाठी दिल्लीतील किसान घाट येथे देशव्यापी आंदोलन करण्यासाठी निघालेल्या हजारो शेतकऱ्यांवर दिल्ली आणि हरियाणा पोलिसांनी तीव्र दडपशाही सुरू केली आहे. 'देश बचाओ मोर्चा' च्या बॅनरखाली देशातील १५४ हून अधिक शेतकरी संघटना या आंदोलनात सामील झाल्या असून, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी, माजी मंत्री महादेव जानकर आणि राष्ट्रीय किसान मोर्चाचे नेते सरदार व्ही. एम. सिंह यांच्यासह हजारो शेतकऱ्यांना पोलिसांनी राजघाट आणि दिल्लीच्या सीमा भागातून ताब्यात घेतले आहे.

Farmers and leaders being detained by Delhi Police during protest against the proposed India-US trade deal at Rajghat.
Farmers March : विद्यार्थ्यानंतर आता शेतकरीही रस्त्यावर, थेट दिल्लीत धडकणार; शंभू बॉर्डरवर शेकडो पोलीस अन्...

पोलीस कारवाई आणि शेतकऱ्यांची धरपकड पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रासह देशाच्या विविध राज्यांतून हजारो शेतकरी आज दिल्लीत दाखल होत होते. मात्र, आंदोलन मोडून काढण्यासाठी दिल्ली पोलिसांनी रात्रीपासूनच व्यापक नाकेबंदी केली. राजघाट आणि किसान घाट परिसराला छावणीचे स्वरूप आले असून, आतापर्यंत जवळपास ५,००० हून अधिक शेतकऱ्यांना वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेऊन विविध पोलीस ठाण्यांमध्ये डांबण्यात आले आहे. राजू शेट्टी आणि महादेव जानकर दिल्लीत पोहोचताच पोलिसांनी त्यांना जबरदस्तीने किसान घाट येथे ताब्यात घेतले, यावेळी पोलीस आणि शेतकरी नेत्यांमध्ये तीव्र शाब्दिक चकमक झाली. तसेच, हरियाणा पोलिसांनी पंजाब-हरियाणाची मुख्य शंभू आणि खनौरी बॉर्डर पूर्णपणे सील केली असून अंबाला परिसरात कलम १६३ लागू केले आहे.

Farmers and leaders being detained by Delhi Police during protest against the proposed India-US trade deal at Rajghat.
आंदोलक तरुणांवर लाठीमार, मोदी-शहांचं नाव घेत अभिजीत दीपकेचं पुन्हा आंदोलन; म्हणाला, सोनम वांगचुक यांच्या जीवाला धोका

शेतकरी नेत्यांनी केंद्र सरकारच्या या कारवाईचा तीव्र निषेध केला आहे.यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, एपस्टीन फाईल्सच्या दबावामुळे"केंद्र सरकार भारत-अमेरिका व्यापार कराराच्या नावाखाली देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांचे भविष्य अंधारात ढकलत आहे. अमेरिकेत कॉर्पोरेट शेतीला प्रचंड सरकारी अनुदान (सबसिडी) मिळते. हा करार झाल्यास अमेरिकेतील स्वस्त कृषी आणि दुग्धजन्य उत्पादने भारतीय बाजारपेठेत येतील. यामुळे भारतातील लहान शेतकरी, दुग्ध व्यावसायिक आणि ग्रामीण अर्थव्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त होईल.

Farmers and leaders being detained by Delhi Police during protest against the proposed India-US trade deal at Rajghat.
CJP Protest: २० जुलै हा ब्लॅक डे! जालियनवाला बाग हत्याकांडाची आठवण करून दिली, संजय राऊत कडाडले

मोदी सरकारने कितीही दडपशाही केली किंवा पोलिसांचा बळाचा वापर केला,दिल्लीपासून ४० किलोमीटर दूर पानिपत परिसरातील राजीव गांधी स्टेडियम व नजीकच्या पोलिस ठाण्यात अटक करण्यात आले. देशातील शेतकरी आपला हक्क मागण्यापासून मागे हटणार नाही, असा इशारा शेतकरी संघटनांच्या समन्वय समितीने दिला आहे. पोलिसांच्या या दडपशाहीविरोधात देशभरात तीव्र संताप व्यक्त होत असून, शेतकऱ्यांची सुटका न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com