CJP Protest: २० जुलै हा ब्लॅक डे! जालियनवाला बाग हत्याकांडाची आठवण करून दिली, संजय राऊत कडाडले

Sanjay Raut On CJP Protest: कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या लाठीमारावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत संतप्त झाले आहेत. त्यांनी थेट मोदी सरकारवर निशाणा साधला.
CJP Protest: २० जुलै हा ब्लॅक डे! जालियनवाला बाग हत्याकांडाची आठवण करून दिली, संजय राऊत कडाडले
Sanjay Raut saam tv
Published On
  • सीजेपीच्या आंदोलनावर पोलिसांचा लाठीचार्ज

  • संजय राऊत यांचा मोदी सरकारवर घणाघात

  • २० जुलै ब्लॅक डे म्हणून घोषीत कराची मागणी

  • कालचा दिवस भारतीय लोकशाहीतील काळा दिवस असल्याचे मत

  • कालच्या दिवसाने जालियनवाला बाग हत्याकांडाची आठवण करू दिली

दिल्लीमध्ये कॉक्रोच जनता पार्टीने २० जुलैला केलेले आंदोलन पोलिसांनी दडपण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला. आंदोलकांना रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण करण्यात आली. या घटनेचा सर्वस्तरावरून निषेध केला जात आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील या घटनेचा निषेध करत थेट सरकारवर घणाघात केला. '२० जुलै हा ब्लॅक डे होता. या घटनेने जालियनवाला बाग हत्याकांडाची आठवण करून दिली.', असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी आज दुपारनंतर आम्ही तिकडे आंदोलनाच्या ठिकाणी जाणार असल्याचे सांगितले.

संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना सीजेपीच्या आंदोलनावरून सरकारवर निशाणा साधला. त्यांनी सांगितले की, 'काल देशाच्या युवा शक्तीने तुम्ही त्याला झेनझी म्हणा किंवा काहीही म्हणा. या युवा शक्तीने आपला संताप आणि उद्रेक व्यक्त केला. त्यालाच आम्ही लोकशाही मानतो. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या सरकारने आणि पोलिसांनी त्या तरुण मुलांवर- मुलींवर ज्याप्रकारचा अमानुष लाठीमार केला, अश्रूधूर सोडला, फरफटत नेलं, पाय तोडले, डोकं फोडलं हे पाहा तुम्ही. आम्हाला जालियनवाला बाग हत्याकांडाची आठवण झाली. जालियनवाला बागेत जनरल डायरने गोळ्या घातल्या. इथे भाजपच्या जनरल कायरने लाठीमार केला, अश्रूधूर सोडला. लहान मुलांचा आक्रोश पाहिला.

CJP Protest: २० जुलै हा ब्लॅक डे! जालियनवाला बाग हत्याकांडाची आठवण करून दिली, संजय राऊत कडाडले
CJP Protest : विद्यार्थिनींवर पोलिसांचा अमानुष लाठीचार्ज; जंतरमंतरवर आक्रोश अन्..., VIDEO पाहून राग अनावर येईल

'यांना मुलंबाळं नसल्यामुळे जे आहे ते परदेशात सुरक्षित असल्यामुळे त्यांना आमच्या भारतातील मातीतल्या मुलांचे आणि त्यांच्या आई-वडिलांचे दु:ख आणि यातना कळणार नाहीत. कालचा दिवस हा भारतीय लोकशाहीतील अत्यंत काळादिवस होता. २० जुलै हा दिवस यापुढे डरपोक दिवस म्हणून साजरा करावा. पोलिसांनी ज्या प्रकारचा हल्ला-अत्याचार केला हा डरपोकपणा आहे. सरकार लहान मुलांना-विद्यार्थ्यांना घाबरले आहे आणि हुकुमशाही पद्धतीने ते आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करत आहे. काल आम्ही सगळे तिथो होतो. काल आम्ही वांगचुक यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. आंदोलकांची जंतर-मंतरवर जाऊन भेट घेतली. आजही आम्ही तिकडे जाणार आहोत.'

CJP Protest: २० जुलै हा ब्लॅक डे! जालियनवाला बाग हत्याकांडाची आठवण करून दिली, संजय राऊत कडाडले
CJP Protest : दिल्लीतील वातावरण तापले! TV स्क्रीनवर मोदी दिसताच आंदोलकांकडून चोर चोर घोषणा | VIDEO

दरम्यान, दिल्लीतील जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांचं आंदोलन पुन्हा एकदा तीव्र झालं आहे. काल आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचार्जनंतरही आज मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि आंदोलक जंतर-मंतरवर दाखल झाले आहेत. सीजेपीच्या समर्थनासाठी तरुणांचा मोठा सहभाग पाहायला मिळत असून सरकारविरोधात घोषणाबाजी आणि लाठीचार्जच्या कारवाईचा निषेध केला जात आहे. आंदोलनस्थळी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कालच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर जंतर-मंतर परिसरात सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली आहे. अभिजीत दिपके यांनी केंद्रातील मंत्र्यांनी स्वतः जंतर-मंतरवर येऊन आंदोलकांशी चर्चा करावी, अशी मागणी केली आहे.

CJP Protest: २० जुलै हा ब्लॅक डे! जालियनवाला बाग हत्याकांडाची आठवण करून दिली, संजय राऊत कडाडले
CJP protest : मुलींचे कपडे फाडले, छातीवर पाय देऊन मारलं; अभिजीत दीपकेंचा गंभीर आरोप, आज पुन्हा संसद मार्च

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com