नवी दिल्लीतील जंतरमंतरवर कॉक्रोच जनता पार्टीचे (CJP) अभिजीत दीपके यांनी रात्री उशिरा पुन्हा एकदा ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. मागण्या मान्य होईपर्यंत तिथून हटणार नाही, असा ठाम पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे.
यादरम्यान अभिजीत दीपके यांनी पोलिसांवर अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आरोप केले आहेत. आंदोलन उधळून लावण्यासाठी पोलिसांनी १५ ते १८ वयोगटातील अल्पवयीन विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीचार्ज केला, ज्यात अनेक विद्यार्थ्यांची डोकी फोडली आणि हात-पाय तोडले. इतकेच नव्हे तर पुरुष पोलिसांनी महिला आंदोलकांचे कपडे फाडले आणि त्यांच्यावर अत्याचार केला, असा थेट आरोप दीपके यांनी केला आहे. सरकारच्या या दडपशाहीविरोधात आणि पोलिसांच्या कारवाईमुळे परिसरात तीव्र संतापाची लाट पसरली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.