CJP Protest : विद्यार्थिनींवर पोलिसांचा अमानुष लाठीचार्ज; जंतरमंतरवर आक्रोश अन्..., VIDEO पाहून राग अनावर येईल

Jantar Mantar protest Video : दिल्लीतील जंतरमंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा दावा करण्यात आला आहे. या कारवाईत अनेक महिला आणि विद्यार्थिनी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

नवी दिल्लीतील जंतरमंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाने अत्यंत हिंसक वळण घेतले आहे. आंदोलनकर्त्यांना घटनास्थळावरून हटवण्यासाठी पोलिसांनी अचानक अमानुष लाठीचार्ज केला, ज्यामध्ये अनेक महिला आणि विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्या आहेत. जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू असतानाच त्यांच्यावर पोलिसांनी लाठीचार्ज केला.

लाठीचार्जदरम्यान विद्यार्थिनींचा मदतीसाठी सुरू असलेला आक्रोश आणि गोंधळामुळे संपूर्ण परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून प्रशासनाकडून तातडीने रॅपिड ॲक्शन फोर्स (RAF) तैनात करण्यात आली आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त केला जात असून सर्व स्तरातून तीव्र निषेध नोंदवला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com