अकोला-खंडवा रेल्वेमार्गामुळे खरीप बुडाला; रेल्वेच्या कारभारामुळे शेतकरी उद्ध्वस्त

Akola-Khandwa Railway Project : प्रस्तावित अकोला-खंडवा रेल्वेमार्गात रेल्वे प्रशासनानं नियोजन शून्यतेचा कळस गाठलाय. रेल्वेमार्गालगतच्या शेतजमिनींमध्ये 3 ते 5 फूटांपर्यंत पाणी साचलंय. साम टिव्हीच्या बातमीनंतर अखेर रेल्वे प्रशासनाकडून शेतात साचलेलं पाणी काढायला सुरुवात केलीये. मात्र, हा तात्पुरता उपाय शेतकऱ्यांची चिंता वाढवू शकतो. पाहूयात यावरचा एक रिपोर्ट.
Waterlogged farmlands along the proposed Akola-Khandwa railway route have damaged Kharif crops, leaving farmers worried about their livelihood.
Waterlogged farmlands along the proposed Akola-Khandwa railway route have damaged Kharif crops, leaving farmers worried about their livelihood.
Published On

रोहित कदम, साम प्रतिनिधी

ही दृश्यं नीट पाहा. जिथे हिरवंगार शिवार दिसायला हवं होतं, तिथं आज पाणीच पाणी दिसतंय..आता तुम्हाला वाटलं असेल हा तलाव आहे...पण ही आहे शेतजमीन. आणि या शेतीची अवस्था झालीय ती रेल्वे प्रशासनाचा नियोजनशून्य कारभारामुळे.. अकोला-खंडवा रेल्वेमार्गासाठी करण्यात आलेल्या भरावामुळे तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड, चित्तलवाडी, परसरामपूर आणि अडगाव परिसरातील हजारो एकर शेती अक्षरशः जलमय झालीये.

Waterlogged farmlands along the proposed Akola-Khandwa railway route have damaged Kharif crops, leaving farmers worried about their livelihood.
Akola Violence: अकोल्यात दोन गटात तणाव, दगडफेक अन् वाहनांची तोडफोड; शेकडो जणांचा पोलीस ठाण्यात ठिय्या

शेतकऱ्यांना कोणतीही कल्पना न देता आणि जमीन अधिग्रहित न करता थेट या मार्गावर ट्रॅकसाठी भराव घालण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. आणि त्यामुळेच ट्रॅकच्या बाजूची सर्व शेतजमीन पावसाच्या पाण्यात गेलीय. शेतकऱ्यांची पिकं पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. त्यामुळे दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांनी केलीय.

Waterlogged farmlands along the proposed Akola-Khandwa railway route have damaged Kharif crops, leaving farmers worried about their livelihood.
Akola : अकोल्यात खळबळ! तुकाराम मुंढेंच्या पथकाची गुटखा कारखान्यावर धाड; ५० लाखांचा मुद्देमाल जप्त

साम टीव्हीनं शेतकऱ्यांची ही व्यथा मांडल्यानंतर झोपलेल्या रेल्वे प्रशासना खडबडून जागं आली. त्यानंतर शेतांमध्ये साचलेल्या पाण्याचा निचरा करण्याचा रेल्वे अधिकाऱ्यांनी जेसीबी पाठवून कामाला सुरूवात केली.

मात्र या पाण्याचं प्रमाण पाहता जेसीबीनं हे सारं पाणी काढणं केवळ अशक्य आहे. एवढंच नव्हे तर पुन्हा पाऊस आल्यानंतर परिस्थिती जैसे थे होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खरीप हंगाम रेल्वेच्या चुकीमुळे पाण्यात गेलाय. त्यामुळे आता रेल्वे प्रशासन यावर कायमचा तोडगा काढून या शेतकऱ्यांना न्याय देणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com