

अकोल्यातील बाभुळगाव येथे दोन गटांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला.
दोन्ही गटांकडून दगडफेक आणि वाहनांची तोडफोड करण्यात आली.
एका गटाकडून धार्मिक स्थळावर हल्ला केल्याची माहिती समोर आली.
अक्षय गवळी, साम प्रतिनिधी
अकोल्यामधील बाभुळगावमध्ये दोन गटात वाद झाला असून परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. सोमवारी काल रात्री दोन गटात किरकोळ कारणानंतर वाद झाला त्यानंतर दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक आणि वाहनाची तोडफोड केली. एका गटाकडून धार्मिक स्थळावर हल्ला करण्यात आला. त्यानंतर दगडफेक करणाऱ्यांना अटक करण्यात यावी म्हणून काहींनी थेट पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला.
हाती आलेल्या माहितीनुसार, दुचाकीचा धक्का लागल्याने या दोन गटातील काही तरुणांमध्ये झाला वाद झाला. यात दोन तरुणांना बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत जवळपास ४ ते ५ जण जखमी झाले असून त्यांना सात ते आठ जणांनी मारहाण केली. दरम्यान या घटनेनंतर बाभूळगाव परिसरात तणाव निर्माण झाला.
वाद होत असताना काहींनी परिसरातील वाहनाची तोडफोड केली. घटनास्थळी अकोला पोलिसांचा मोठा बंदोबस्त करण्यात आला. मात्र घटनेनंतर धार्मिक स्थळावर दगडफेक करणाऱ्यांना तात्काळ अटक करा, या मागणीसाठी एका गटातील शेकडो लोकांनी MIDC पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. तब्बल तासभर पोलीस ठाण्यात त्यांनी ठिय्या मांडला. सध्या गावात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांकडून सर्वांना शांततेच आवाहन केलं जातंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.