Iran US Conflict: अमेरिकेविरोधात इराणचं 'आर्थिक अस्त्र', अमेरिकन कंपन्यांवर हल्ला? वाचा संपूर्ण लिस्ट

list of American companies threatened by Iran conflict: अमेरिकेविरोधात इराणने आर्थिक अस्त्र वापरण्यास सुरुवात केली आहे. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सनं अमेरिकेच्या बड्या तंत्रज्ञान आणि औद्योगिक कंपन्यांना लक्ष्य करण्याची धमकी दिलीये.
Iran US Conflict: अमेरिकेविरोधात इराणचं 'आर्थिक अस्त्र', अमेरिकन कंपन्यांवर हल्ला?  वाचा संपूर्ण लिस्ट
Iran US ConflictSaam Tv
Published On

Summary -

  • इराणकडून अमेरिकेविरोधात आर्थिक रणनीती

  • मोठ्या अमेरिकन टेक कंपन्यांना थेट इशारा

  • एआय आणि तंत्रज्ञानामुळे युद्ध अधिक तीव्र

  • जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता

रोहित कदम, साम टीव्ही

इराणनं अमेरिकेविरोधात पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेत नवा इशारा दिलाय. अमेरिका युद्धात तंत्रज्ञानाचा वापर करत असल्याचा आरोप याआधीच इराणनं केलाय. याच पार्श्वभूमीवर इराणनं नवी रणनीती आखलीये. इराणनं आखलेली नवी रणनीती नेमकी काय आहे पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

इराणनं अमेरिकेविरोधात आक्रमक पवित्रा घेत पुन्हा एकदा जगात खळबळ उडवून दिलीये. त्यामुळे जगात आर्थिक अस्थिरतेची मोठी लाट उसळण्याची शक्यता आहे. नव्या रणनीतीनुसार, आधी सैन्यावर, नंतर तेलाच्या क्षेत्रावर आणि आता थेट अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर इराणनं आपलं लक्ष्य वळवलंय. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सनं अमेरिकेच्या बड्या तंत्रज्ञान आणि औद्योगिक कंपन्यांना लक्ष्य करण्याची धमकी दिलीये.

Iran US Conflict: अमेरिकेविरोधात इराणचं 'आर्थिक अस्त्र', अमेरिकन कंपन्यांवर हल्ला?  वाचा संपूर्ण लिस्ट
Iran–Israel–US conflict: एक महिन्यानंतरही युद्ध सुरूच; आखाती युद्धामुळे जगाची इंधनकोंडी

इराणनं धमकी दिलेल्या अमेरिकन कंपन्या नेमक्या कोणत्या आहेत?

डेल

मायक्रोसॉफ्ट

गुगल

अॅपल

इंटेल

IBM

टेस्ला

बोईंग

Hewlett Packard(HP)

सिस्को

ओरॅकल

मेटा

JPMorgan

General Electric

G42

Nvidia

Planert

Iran US Conflict: अमेरिकेविरोधात इराणचं 'आर्थिक अस्त्र', अमेरिकन कंपन्यांवर हल्ला?  वाचा संपूर्ण लिस्ट
अमेरिका-इस्रायलची संयुक्त कारवाई; इराणच्या दारुगोळा कोठाराचा नाश|VIDEO

खरं तर, अमेरिका या युद्धात आपल्या लष्करी मोहिमांमध्ये माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा मोठ्या प्रमाणावर वापर करतंय. त्यामुळे इराणनं अमेरिकन टेक कंपन्यांना धमकी देण्यामागचं मुख्य कारण म्हणजे युद्धात अमेरिकेकडून होत असलेला तंत्रज्ञानाचा वापर. या युद्धात अमेरिका तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं सॅटेलाइट इमेजरी आणि पाळत ठेवणारे ड्रोन याद्वारे मोठ्या प्रमाणात डेटा गोळा करतेय. एआयच्या मदतीनं या डेटाचे सखोल विश्लेषण केलं जात आहेत. शत्रूची कमांड सेंटर्स अचूकपणे शोधणे सोपं होतंय. अनेक टेक कंपन्यांकडून पुरवल्या जाणाऱ्या क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर आणि मॅपिंग टूल्सचा वापर संरक्षणासाठी केला जातोय. एका अहवालानुसार, व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना पकडण्यासाठी देखील अमेरिकेनं अशाच प्रगत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला होता.

Iran US Conflict: अमेरिकेविरोधात इराणचं 'आर्थिक अस्त्र', अमेरिकन कंपन्यांवर हल्ला?  वाचा संपूर्ण लिस्ट
Iran-Israel War: इराणच्या ४०० किलो युरेनियमवर अमेरिकेचा डोळा, अमेरिकन सैन्याचा मास्टर प्लॅन काय?

याआधी देखील 2020 मध्ये इराणी हॅकर्सनी अमेरिकेच्या डझनभर कंपन्या आणि सरकारी संस्था हॅक केल्या होत्या. तर 2022 मध्ये अल्बानियासारख्या NATO देशाच्या संपूर्ण सरकारला मोठा धक्का दिला होता. अशातच आता इराणनं अमेरिकेला पूर्णपणे नामोहरम करण्यासाठी अमेरिकेच्या तंत्रज्ञान कंपन्यांना आणि त्यातून आलेल्या आर्थिक ताकदीलाच टार्गेट केलं आहे. आता अमेरिका इराणच्या या आव्हानाला कसं प्रत्युत्तर देणार, याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय.

Iran US Conflict: अमेरिकेविरोधात इराणचं 'आर्थिक अस्त्र', अमेरिकन कंपन्यांवर हल्ला?  वाचा संपूर्ण लिस्ट
US-Israel-Iran War : अमेरिका माघार घेणार, युद्धविराम होणार? ट्रम्प गुरुवारी संबोधित करणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com