

इराणने होर्मुझ सामुद्रधुनी अटींसह खुली केली
शत्रू देशांच्या जहाजांवर निर्बंध
जागतिक व्यापार आणि तेल पुरवठ्यावर परिणाम
आखाती देशांमधील युद्ध दिवसेंदिवस अधिक तीव्र होत आहे. इराण अमेरिका आणि इस्रायलला तडीसतोड देत आहे. होर्मुझची सामुद्रधुनी रोखून इराणने अमेरिकेला गुडघे टेकायला लावले आहे. त्या जेरीस आलेल्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला ४८ तासांचा अल्टिमेटम दिला आहे. जर ४८ तासांच्या आत होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे उघडली नाही, तर इराणच्या वीज प्रकल्पांवर हल्ला करण्यात येईल,अशी धमकी अमेरिकेने दिली आहे.
ट्रम्प यांच्या धमकीनंतर लगेचच इराणने आपले प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी महत्त्वपूर्ण घोषणा करण्यासोबतच अटी लादून अमेरिकेला आणखी एक धक्का दिला. या प्रत्युत्तरातून इराण अमेरिकेपुढे झुकणार नसल्याचं स्पष्ट केलंय. मध्य पूर्वे (पश्चिम-आशिया) तील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत एक महत्त्वपूर्ण निवेदन जारी केले आहे.
इराणने म्हटलं की, होर्मुझची सामुद्रधुनी सर्व देशांच्या जहाजांसाठी खुली आहे. त्यात असे नमूद केले होते की, शत्रू राष्ट्रांच्या जहाजांना या मार्गातून जाण्याची परवानगी दिली जाणार नाही. इराणने स्पष्ट केले की हा मार्ग जगभरातील देशांसाठी खुला आहे, परंतु त्यांच्या शत्रू राष्ट्रांच्या जहाजांना त्यातून जाण्यास मनाई असेन.
इराणचा रोख अमेरिका, इस्रायल आणि आखाती देशांवर होता. इराणने संयुक्त अरब अमिरात, कतार, कुवेत आणि सौदी अरेबिया यांसारख्या अमेरिकेचे मित्रराष्ट्र असलेल्या सर्व मध्य पूर्वेकडील देशांना या मार्गापासून दूर राहण्याचा इशारा दिलाय. इराणचे प्रतिनिधी अली मौसवी यांनी सांगितले की, शत्रू देशांशी संलग्न नसलेली जहाजे सुरक्षा नियमांचे पालन करून या मार्गातून जाऊ शकतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.