अमेरिका-इस्रायलची संयुक्त कारवाई; इराणच्या दारुगोळा कोठाराचा नाश|VIDEO

US Israel Joint Airstrike On Iran Dezful Airbase: अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यात इराणमधील डेझफुल येथील हवाई तळ उद्ध्वस्त केले आहे.

इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धानं आता अत्यंत भीषण वळण घेतलं आहे. अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त फौजांनी इराणमधील डेझफुल येथील ‘वाहदती’ हवाई तळावर मोठा हवाई हल्ला केला आहे. या हल्ल्यात इराणचं मुख्य दारुगोळा कोठार पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याची माहिती समोर आली आहे. हल्ल्यानंतर तळावर एकामागून एक मोठे स्फोट झाल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. या कारवाईमुळे इराणच्या लष्करी क्षमतेला मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे. दरम्यान, या हल्ल्यानंतर संपूर्ण मध्यपूर्वेत तणाव प्रचंड वाढला असून युद्धाचा वणवा अधिक तीव्र होताना दिसत आहे. पुढील काही दिवसांत परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com