३० रणरागिणींनी चालवलं फायटर जेट; इराणच्या लष्करी तळांची केली राखरांगोळी, व्हिडिओ पाहा

Operation Roaring Lion: इस्रायलच्या ऑपरेशन रोअरिंग लायन मोहिमेत सुमारे 30 महिला वैमानिकांनी ऐतिहासिक नेतृत्व करत इराणच्या लष्करी तळांवर लक्ष्य साधले.

शत्रूचे कंबरडे मोडणाऱ्या इस्रायलच्या ऑपरेशन रोअरिंग लायन मेहिमेत सुमारे 30 महिला वैमानिकांचा सिंहाचा वाटा आहे. इराणच्या लष्करी तळांना लक्ष्य करण्यासाठी इस्रायलने सुरू केलेल्या मोहिमेत इस्रायली हवाई दलाच्या महिला रणरागिणींनी ताकद दाखवून दिलीये. इस्रायली हवाई दलाच्या इतिहासात इतक्या मोठ्या संख्येने महिला वैमानिकांनी मोहिमेचे नेतृत्व करण्याची ही पहिलीच वेळ मानली जातेय.

इराणच्या विविध लष्करी तळांना लक्ष्य करण्यासाठी इस्रायलने आपल्या अत्याधुनिक लढाऊ विमानांचा ताफा पाठवला होता. या ताफ्याचे नेतृत्व आणि प्रत्यक्ष हल्ल्याची जबाबदारी महिला रणरागिणींनी समर्थपणे पेलली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आणि शत्रूच्या रडार यंत्रणेला चकवा देत या महिला वैमानिकांनी इराणच्या संरक्षण व्यवस्थेला खिंडार पाडले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com