Iran-Israel War: इराणच्या ४०० किलो युरेनियमवर अमेरिकेचा डोळा, अमेरिकन सैन्याचा मास्टर प्लॅन काय?

Middle East Tensions Rise: इराण आणि इस्राइल-अमेरिका या देशामध्ये युद्ध सुरू आहे. इराणच्या ४०० किलो युरेनियमवर अमेरिकेचा डोळा आहे. अमेरिका सैन्याने मास्टर प्लॅन केला आहे.
Iran-Israel War: इराणच्या ४०० किलो युरेनियमवर अमेरिकेचा डोळा, अमेरिकन सैन्याचा मास्टर प्लॅन काय?
Iran-Israel WarSaam
Published On

Summary -

  • इराण-इस्रायल युद्धामुळे तणाव वाढला

  • अमेरिकेचा इराणच्या युरेनियमवर डोळा

  • ग्राउंड ऑपरेशनची शक्यता

  • इराणकडून अमेरिकेला कडक इशारा

गिरीश निकम, साम टीव्ही

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला कायमचा लगाम घालण्यासाठी मास्टर प्लॅन आखलाय..यासाठी इराणमध्ये थेट 'ग्राउंड ऑपरेशन' करण्याची शक्यता आहे. तर इराणनेही वेलकम टू हेल असं म्हणत अमेरीकेला सडेतोड इशारा दिलाया. पाहूया एक रिपोर्ट...

पश्चिम आशियामध्ये युद्ध सुरू होऊन एक महिना उलटला आहे. मात्र युद्ध संपण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. हवाई हल्ल्यानंतर आता अमेरिकन सैन्य इराणवर जमिनीवरून हल्ला करण्याच्या तयारीत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची वक्तव्यं आणि मध्य पूर्वेतील अमेरिकेची वाढती लष्करी उपस्थिती या चर्चांना आणखी खतपाणी घालत आहे. इराणमध्ये अमेरीकन फौजा घुसवण्यामागे मोठं कारण आहे. इराणच्या युरेनियमवर अमेरीकन सरकारचा डोळा आहे.

Iran-Israel War: इराणच्या ४०० किलो युरेनियमवर अमेरिकेचा डोळा, अमेरिकन सैन्याचा मास्टर प्लॅन काय?
Iran-America War: इराण-अमेरिकेचं युद्ध १० दिवसांसाठी थांबलं; डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती | VIDEO

अमेरीकेच्या गुप्तचर संस्थांच्या अहवालानुसार इराणच्या अणुसुविधा केंद्रामध्ये युरेनियम साठवलेले आहे. सुमारे 400 किलो युरेनियम इराणकडे आहे. त्यापासून अण्वस्त्र बनवण्याची इराणची योजना आहे. हे युरेनियम ताब्यात घेण्यासाठी थेट जमिनीवरची लढाई लढण्यासाठीही अमेरीका तयार आहे. त्यासाठी अमेरीकेचे लष्करी मुख्यालय पेंटागॉन मध्य-पूर्वेत 10 हजारपर्यंत अतिरिक्त सैन्य तैनात करत आहे. अमेरिकेच्या सेंट्रल कमांड तर जाहीरच करून टाकलय की, अडीच हजार नौदलाच्या सैनिकांसह साडेतीन हजाराहून अधिक सैनिक मध्य-पूर्वेत दाखल झाले आहेत.

Iran-Israel War: इराणच्या ४०० किलो युरेनियमवर अमेरिकेचा डोळा, अमेरिकन सैन्याचा मास्टर प्लॅन काय?
US Iran War : युद्धामुळे जगावर कोरोनासारखं संकट, संपूर्ण जग ठप्प होणार? पुतीन यांचा गंभीर इशारा

इराणला अण्वस्त्र बनवण्यापासून रोखण्यासाठी आपण कोणत्याही थराला जाऊ शकतो, असा पुनरुच्चार अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्म्प यांनी केलाय. त्यासाठीच अमेरिका इराणमध्ये जमिनीवरील धोकादायक लष्करी कारवाई करण्याची योजना आखत आहे. दुसरीकडे इराणनेही 'वेलकम हू हेल' असं सांगत इराणच्या भूमीवर पाऊल ठेवणारा अमेरिकी सैनिक “शवपेटीतूनच परत जाईल, अशी थेट धमकी दिलीये. त्यामुळे युरेनियमसाठी अमेरिकन फौजा खरंच इराणच्या भूमिवर उतरणार का? आणि इराणही त्यांना नरकाचा रस्ता दाखवणार का? याकडे जगाचं लक्ष आहे.

Iran-Israel War: इराणच्या ४०० किलो युरेनियमवर अमेरिकेचा डोळा, अमेरिकन सैन्याचा मास्टर प्लॅन काय?
Iran–Israel–US conflict: एक महिन्यानंतरही युद्ध सुरूच; आखाती युद्धामुळे जगाची इंधनकोंडी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com