Iran-America War: इराण-अमेरिकेचं युद्ध १० दिवसांसाठी थांबलं; डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती | VIDEO

Iran-America War Stopped for 10 Days: इराण अमेरिका युद्ध थांबण्याचे संकेत दिसत आहे. अमेरिकेने पुढचे १० दिवस इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ला न करण्याचे ठरवले आहे.

इराण अमेरिका युद्ध जवळपास महिन्याभरापासून सुरु आहे. या युद्धामुळे संपूर्ण जगावर वाईट परिणाम होताना दिसत आहे. दरम्यान, आता युद्ध थांबण्याचे संकेत देण्यात आले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणमधील ऊर्जा प्रकल्प नष्ट करण्याच्या मोहिमेला तात्पुरती स्थगिती दिली आहे. पुढील 10 दिवस इराणच्या वीज प्रकल्पांवर हल्ले न करण्याचे निर्णय अमेरिकेकडून जाहीर करण्यात आले आहे. इराणच्या विनंतीवरून हा निर्णय घेतल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील वाटाघाटी सुरू असून त्या सकारात्मक दिशेने पुढे जात असल्याचं दिसत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात युद्ध थांबू शकतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com