Iran–Israel–US conflict: एक महिन्यानंतरही युद्ध सुरूच; आखाती युद्धामुळे जगाची इंधनकोंडी

Iran–Israel–US conflict: एक महिन्यानंतरही इराण-इस्त्राईल अमेरीका युद्ध भडकलेलेच आहे. आखाती युद्धामुळे जगाची इंधनकोंडी झालेली आहे. अमेरीका-इस्त्राईल या दोन बलाढ्य राष्ट्रांचे हल्ले झेलत इराण ठामपणे प्रतिक्रार करत आहे. यापुढची लढाई जमिनीवरुन होणार का? अमेरीकेची उद्दीष्ट पूर्ण झाली आहेत का? पाहूयात एक खास रिपोर्ट.
Iran–Israel–US conflict:
Rising tensions in the Middle East trigger global fuel crisis amid ongoing war.saam tv
Published On

अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाला तब्बल एक महिना पूर्ण झाला आहे. पण युद्ध थांबण्याची शक्यता अद्यापही धूसर आहे. सर्वाधिक हानी होऊनही इराण पेटून उठलाय. सर्वोच्च नेते खामेनी आणि वरीष्ठ लष्करी अधिकारी ठार झाल्यानंतर इराणमध्ये सत्तातंर होईल, हा अमेरीकेचा अंदाज सपशेल चुकलाय.

Iran–Israel–US conflict:
अमेरिकेत ट्रम्पविरोधात 'नो किंग्स' आंदोलन; 90 लाख नागरीक उतरले रस्त्यावर, कारण काय?

होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणचं वर्चस्व असल्याने जगाची इंधनकोंडी झालीय. त्याची झळ भारतासह अनेक देशांना बसतेय. आतापर्यंत या युद्धात जवळपास अडीच हजार जणांचा मृत्यू झालाय. अमेरिकेने एका बाजूला मागच्या दाराने चर्चा चालविली असली, तरी इराणवर जमिनीवरुन आक्रमण करण्याची चालही रचलीय. अमेरिकेची प्रमुख उद्दिष्टे काय आहेत पाहूयात.

एक महिना पूर्ण, उद्दिष्ट अपूर्ण

अणुशस्त्रांना अटकाव -

इराणने अण्वस्त्रे विकसित करू नयेत आणि त्यांच्या अणुकार्यक्रमावर मर्यादा राहाव्यात, हे अमेरिकेचे सर्वात मोठे उद्दिष्ट आहे

इस्रायलचे संरक्षण -

मध्य-पूर्वेतील आपला सर्वात जवळचा मित्र देश 'इस्रायल'च्या सुरक्षेसाठी इराणच्या वाढत्या प्रभावाला रोखणे अमेरिकेला महत्त्वाचे वाटते

दहशतवादाला लगाम -

अमेरिकेच्या मते इराण 'हिजबुल्ला' आणि 'हमास' सारख्या संघटनांना पाठबळ देतो, हे पाठबळ नष्ट करणे हे त्यांचे ध्येय आहे.

Iran–Israel–US conflict:
इराण-अमेरिका युद्धात दहशतवाद्यांची एन्ट्री, हुथी दहशतवादी करणार जगाची नाकेबंदी?

प्रादेशिक वर्चस्व रोखणे -

इराक, सीरिया आणि येमेनमध्ये इराणचा वाढता राजकीय आणि लष्करी हस्तक्षेप कमी करून स्वतःचे वर्चस्व टिकवणे

तेल पुरवठा आणि व्यापार मार्ग -

'हॉर्मुजची सामुद्रधुनी' या महत्त्वाच्या जागतिक तेल व्यापार मार्गावर इराणचे नियंत्रण येऊ न देणे.

सत्तापालटाचा प्रयत्न -

इराणमधील सध्याची धार्मिक राजवट बदलून तिथे अमेरिकाधार्जिणे किंवा लोकशाहीवादी सरकार आणणे, हे अमेरिकेचे सुप्त उद्दिष्ट राहिले आहे

क्षेपणास्त्र कार्यक्रमावर बंदी

इराणची बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे विकसित करण्याची क्षमता नष्ट करणे, जेणेकरून अमेरिकन तळांना धोका निर्माण होणार नाही.

अमेरिकेने सध्या 10 ते 12 हजार नौसैनिक आखाती प्रदेशात तैनात केलेत. ट्रम्प यांच्या धरसोड वृत्तीमुळे आणि खोटेपणामुळे त्यांच्यावर अनेक राष्ट्रांचा विश्वास नाही. त्यामुळे युद्धात नाटो सदस्य देशांनी अमेरिकेला अपेक्षित लष्करी मदत नाकारली आहे. एकतर्फी युद्ध थांबविले, तर अमेरिकेने माघार घेतली, असा संदेश जगात जाऊ शकतो.

युद्ध पुढे चालू ठेवले, तर अमेरिकेत जनमानसावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. त्यातच नोव्हेंबरमध्ये अमेरिका सिनेटच्या निवडणुका आहेत. त्यामुळे ट्रम्प इराणवर निर्णायक आक्रमण करण्याच्याही विचारात आहेत. पण त्यातही धोके आहेत. युद्ध नको शांतता हवी, अशी भूमिका भारतासह अनेक देशांनी घेतली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत युद्ध थांबवण्यासाठी ठोस पाऊल उचलली जाणार का? याकडे जगाचं लक्ष आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com