

जगात युद्धाचा भडका उडालाय, पण हे युद्ध आता रणांगणापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. ज्यांनी जगावर युद्ध लादलं, त्यांच्याच खुर्च्या आता धोक्यात आल्यात. आता अमेरिकेत पेटलेला 'नो किंग्स' आंदोलनाचा हा वणवा पाहा. अमेरिकेत ट्रम्पविरोधात तब्बल 90 लाख नागरिक रस्त्यावर उतरले.तर इस्रायलमध्येही पंतप्रधान नेत्यानाहूंविरोधात नो वॉरचे नारे घुमतायत, त्यामुळे आपल्याच देशात ट्रम्प कसे एकाकी पडलेत. पाहूयात?
ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील तानाशाही, हुकूमशाहीविरोधात हे तिसरं आंदोलन आहे.'नो किंग्स'ची अमेरिकेत 3 हजार ठिकाणी आंदोलन होण्याची शक्यता आहे.. ट्रम्प यांची धोरणं, वाढती महागाई तसेच इराणसोबतचे युद्ध या मुद्दावरून नागरीकांकडून आंदोलन करण्यात आलं. आंदोलकांनी कॅलिफोर्निया, न्यू जर्सी, फ्लोरिडा, टेक्सास, वॉशिंग्टन डी.सी, न्यूयॉर्क सिटी, मिडटाऊन मॅनहडनमध्ये मोठे आंदोलन आणि मोर्चा काढण्यात आलेत.
तर सॅन फ्रान्सिस्कोसह अनेक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आणि गाण्यातून ट्रम्प यांना हाकलण्याचे आवाहन केले गेले. यावेळी युक्रेन युद्ध आणि ट्रान्सजेंडर धोरणावरूनही ट्रम्प याचा नागरिकांनी विरोध केला. दुसरीकडे फक्त अमेरिकाच नाही, तर इस्रायलची राजधानी तेल अवीव सुद्धा आंदोलनांनी पेटलीय..पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या विरोधात लाखो नागरिक रस्त्यावर उतरले आहेत."आम्हाला युद्ध नको, शांतता हवी," म्हणत इस्रायली जनता आपल्याच सरकारला जाब विचारतेय.
त्यामुळे इराणला गुडघे टेकायला लावण्याचे ट्रम्प आणि नेत्यनाहू यांचे मनसुबे आता फोल ठरतायत. इराणच्या निकराच्या लढ्यामुळे हे युद्ध लांबलंय. त्याची किंमत आता या दोन्ही नेत्यांना त्यांच्या देशातील द्वेषाने मोजावी लागतेय. नोव्हेंबर 2025 मध्ये अमेरिकेत झालेल्या गव्हर्नर पदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार निर्णायक मताधिक्यानं विजयी झाले होते. त्यामुळे अमेरिकेत ट्रम्पविरोधी वारं वाहत असल्याचं तेव्हाच स्पष्ट झालंय.
कारण 2024 ला सत्तेत आलेल्या ट्रम्प प्रशासनासाठी दहा महिन्यांनी होणारी ही निवडणुक महत्त्वाची होती.. मात्र त्या निवडणुकीत ट्रम्प चक्क नापास झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे आता येत्या नोव्हेंबरला होणाऱ्या मध्यावधी निवडणुकीत ट्रम्प यांना फटका बसून डेमोक्रॉटीक पक्षाची पकड मजबूत होऊ शकते. त्यामुळे ट्रम्प आपल्याच देशातील जनआंदोलनासमोर झुकणार की स्वत:चाच हेका कायम ठेवल्यानं सत्ता गमावणार? याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.