रशिया करणार जगाची तेलकोंडी; ट्रम्पनंतर पुतीनचा 'रशिया फर्स्ट'चा पवित्रा

Russia Halt Fuel Exports : आखाती युद्धाला आता एक महिना उलटलाय. अशातच रशियानं जगाची तेलकोंडी करत मोठा निर्णय जाहीर केलाय. पुतिन यांनी रशिया फर्स्ट'चा हा पवित्रा नेमका का घेतला? रशियाच्या एका निर्णयानं जगाची इंधनकोंडी कशी होणार आहे? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.
Russia Halt Fuel Exports :
Russia’s fuel export decision raises concerns of a global oil shortage and rising energy crisis.saam tv
Published On
Summary
  • ‘रशिया फर्स्ट’ धोरणाचा अवलंब

  • जागतिक इंधन टंचाईची शक्यता

  • तेलाच्या किमती वाढण्याचा अंदाज

रोहित कदम, साम प्रतिनिधी

इराण-अमेरिका यांच्यातील युद्धानं जगावर तेल संकट गडद झालं असताना आता रशियानं मोठं पाऊल उचललंय. रशियानं आपल्या देशात इंधनाचा तुटवडा उद्भवू नये म्हणून जगाला इंधन पुरवठा करणं थांबवणार आहे. इंधन उत्पादन क्षेत्रातील प्रमुख देशांपैकी एक रशिया आहे. देशांतर्गत इंधनाच्या किमती स्थिर करण्यासाठी रशियन सरकारनं मोठी पावले उचलली आहेत.

Russia Halt Fuel Exports :
होर्मुझवरून इराण करतंय जगाची नाकेबंदी? एका जहाजासाठी 18 कोटींचा टोल?

इराण-अमेरिका युद्धामुळे इंधनाच्या किंमतीमध्ये मोठ्या प्रमाणात चढ-उतार दिसत आहेत

रशियानं 1 एप्रिलपासून पेट्रोलच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा प्रस्ताव आणलाय. ही बंदी केवळ काही आठवड्यांसाठी नाही तर तब्बल चार महिने, म्हणजेच 31 जुलैपर्यंत लागू राहण्याची शक्यता आहे. रशियाच्या निर्णयामुळे चीन, तुर्की, ब्राझील, आफ्रिका आणि सिंगापूर यांसारख्या थेट पेट्रोल आयात करणाऱ्या देशांच्या ऊर्जा बाजारात मोठा व्यत्यय येऊ शकतो. खरंतर रशियानं आपल्या इंधन निर्यातीबाबत इतका कठोर निर्णय घेण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. जगात इंधन संकट निर्माण झालेलं असताना पेट्रोल निर्यात बंद करण्यामागे रशियाचा नेमका हेतू काय आहे पाहूयात.

Russia Halt Fuel Exports :
Iran-US War: रशियाच्या ड्रोनमुळे इराणची ताकद वाढली; अमेरिकेच्या वर्चस्वादी धोरणाला रशियाचा शह?

देशातील इंधन किंमतीवर लगाम आणि इंधन तुटवड्याचा सामना करावा लागू नये, यासाठी रशियानं पेट्रोल निर्यातीवर बंद घातली होती. मिळालेल्या माहितीनुसार, रशियानं मागच्या वर्षी 50 लाख मेट्रिक टन पेट्रोल निर्यात केली होती. म्हणजेच, प्रतिदिन 1 लाख 17 हजार बॅरल पेट्रोलची निर्यात केली होती.

त्यामुळे इतका मोठा इंधन साठा आंतरराष्ट्रीय बाजारात न आणता देशांतर्गत बाजारात सुरक्षित ठेवण्यासाठी रशियन प्रशासन सतर्क आहे. विशेषतः शेतीचा हंगाम आणि वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर स्वतःच्या देशातील पुरवठा साखळी विस्कळीत होऊ नये, हा रशियाचा मुख्य उद्देश असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलंय. इराण-अमेरिका युद्धात ऊर्जा क्षेत्रामुळे रशियाच्या महसुलात लक्षणीय वाढ झालीये. तेल व्यापारातून रशियाची कमाई किती ते पाहूयात

रशिया कच्चे तेल आणि वायूच्या विक्रीतून दररोज अंदाजे 760 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच अंदाजे 7212 कोटी रुपये कमावतोय. महत्त्वाचं म्हणजे, युद्ध लवकर थांबलं तरी, रशियाचा संपूर्ण वर्षासाठीचा एकूण तेल आणि वायू महसूल आता अंदाजे 218.5 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचू शकतो. हा आकडा अलीकडील अंदाजापेक्षा 63 टक्क्यांनी जास्त आहे. भारत आपल्या कच्च्या तेलाच्या गरजेपैकी अंदाजे 80% तेल आयात करतो, त्यापैकी अंदाजे 20% रशियाकडून येते.

इराण आणि इस्त्रायल-अमेरिका यांच्यातील युध्दामुळे जागतिक तेल व्यापारात मोठी अस्थिरता निर्माण झालीये. असं असताना जगाला दररोज 1 लाख 70 हजार बॅरल पेट्रोल निर्यात करणारा रशिया आता 'मैत्री नंतर आधी आपली गरज' असा पवित्रा घेतोय. त्यामुळे आगामी काळात रशियाच्या या निर्णयामुळे जगाची इंधनकोंडी होणारेय, एवढं मात्र नक्की.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com