इराण-अमेरिका युद्धात दहशतवाद्यांची एन्ट्री, हुथी दहशतवादी करणार जगाची नाकेबंदी?

Iran Israel War: आता इराण आणि इस्त्रायल-अमेरिका युद्धात दहशतवाद्यांची एन्ट्री झालीये. हुथी दहशतवाद्यांनी इराणच्या समर्थनार्थ आपल्या शक्तीचं प्रदर्शन करण्यास सुरूवात केलीय. हुथींच्या या पवित्र्यामुळे जगाची कशी नाकेबंदी होणारेय, पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून....
Houthi fighters display weapons during a protest in Yemen amid rising tensions in the Middle East conflict.
Houthi fighters display weapons during a protest in Yemen amid rising tensions in the Middle East conflict.Saam Tv
Published On

इराण आणि इस्त्रायल-अमेरिका युध्द सुरू होऊन एक महिना पूर्ण झालाय. अशातच इराण- अमेरिका संघर्षात आता इराण समर्थक असलेल्या येमेनमधील हुथी दहशतवाद्यांची एन्ट्री झालीय. इस्रायल- अमेरिकेनं इराणवर हल्ले सुरु ठेवल्यास थेट युद्धात उतरू असा इशारा देणारे हुथी दहशतवादी आता रणभूमीवर उतरलेत...हुथी दहशतवाद्यांनी इस्त्रायलवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागल्याचा दावा केलाय.

दुसरीकडे येमेनची राजधानी सना शहरात रस्त्यावर हुथी दहशतवाद्यांनी शस्त्रे उगारून आपली ताकद दाखवत निदर्शने केलीयत. त्यांनी इराण आणि लेबनॉनच्या समर्थनार्थ घोषणाही दिल्यात. एव्हंढच नाही तर इराण आणि इस्त्रायल-अमेरिका युद्धात हुथी दहशतवाद्यांची एन्ट्री जगासाठी धोकादायक ठरणारेय. होर्मुझ आणि बाब अल-मंदेब या दोन्ही जलमार्गांवर दबदबा असणारे हुथी दहशतवादी कोण आहेत आणि त्यांची भूमिका का महत्त्वाची आहे ? पाहूयात..

'अन्सार अल्लाह' म्हणजेच अल्लाचे समर्थक म्हणूनही हुथी दहशतवादी ओळखले जातात. हुथी दहशतवादी येमेनमधील एक सशस्त्र आणि राजकीय गट आहेत. 1990 च्या दशकात उदयास आलेले हुथी प्रामुख्याने झैदी शिया मुस्लिम समुदायाशी संलग्न आहेत. सुरुवातीला एक धार्मिक-सामाजिक असेलेली चळवळ कालांतराने एक प्रमुख लष्करी संघटना बनली. 2014-15 मध्ये, हुथी दहशतवाद्यांनी येमेनची राजधानी सना ताब्यात घेतली आणि तेव्हापासून देशाच्या मोठ्या भागांवर त्यांचे नियंत्रण आहे. हुथी दहशतवाद्यांना इराणकडून राजकीय आणि काही प्रमाणात लष्करी पाठिंबा मिळतो असे बोलले जाते. जरी हुथी दहशतवादी पूर्णपणे इराणच्या नियंत्रणाखाली नसले तरीही त्यांना प्रादेशिक राजकारणातील इराणच्या प्रभावशाली गटाचा भाग मानले जाते.

दरम्यान हुथी दहशतवाद्यांच्या इस्रायलवरील हल्ल्यानंतर Axis of Resistance हा गट चर्चेत आलायं...येमेनमधील हुथी दहशतवादी, लेबनॉनची हिजबुल्ला, पॅलेस्टिनी संघटना, इराक, सीरियामधील काही सशस्त्र गटांचा यामध्ये समावेश आहे. हे सशस्त्र गट नेहमीच अमेरिका आणि इस्त्रायलच्या मनमानीला विरोध करत आलेत.. त्यात आता इराण-अमेरिका युद्धात हुथी दहशतवादी उतरल्यामुळे जगाची डोकेदुखी वाढणार आहे? ती कशी पाहूयात...

होर्मुझनंतर बाब अल-मंदेब हा जगातील सर्वात महत्त्वाच्या सागरीमार्गांपैकी एक आहे. बाब अल-मंदेब हा युरोप आणि आशिया यांच्यासाठी एक महत्त्वाचा ऊर्जा मार्ग आहे. या जलमार्गावर हुथी दहशतवाद्यांचं वर्चस्व आहे.. या जलमार्गावरून मोठ्या प्रमाणात तेल आणि वायूची वाहतूक होते. जागतिक व्यापारापैकी अंदाजे 10-15 टक्के व्यापार याच मार्गातून होतो. इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीवर आधीच नाकेबंदी केलीय, त्यातच हुथी दहशतवाद्यांनी हा मार्गही रोखला तर जगावर मोठे आर्थिक संकट निर्माण होऊ शकते.

इराण-अमेरिका-इस्त्रायल युद्धात हुथी दहशतवाद्यांच्या एन्ट्रीमुळे जगावरील युद्धसंकट आणखी गडद होण्याची शक्यता आहे. इतकंच नाही तर हुथींच्या भूमिकेमुळे 'Axis of Resistance' गट आता पूर्ण ताकदीने अमेरिका-इस्रायलविरोधात सक्रीय होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे हुथी दहशतवाद्यांच्या मदतीनं इराण अमेरिका-इस्रायलचे मनसुबे हाणून पाडणार का? हुथी दहशतवाद्यांना रोखण्यासाठी अमेरिका नेमकी काय भूमिका घेणार? याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलयं...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com