इराण अमेरिकेसोबत चर्चेसाठी तयार? युद्धावरून मुस्लिम देशांत खलबतं

Middle East Crisis: इराणला नमवणं अमेरिकेच्या हाताबाहेर जाऊ लागलं असतानाच आशियाई राजकारणात मोठ्या हालचाली सुरू झाल्यात. इराण-अमेरिकेच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानात बैठक झालीये. या बैठकीत नेमकं काय घडलंय, पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.
Middle East Crisis:
Diplomatic talks gain momentum as Iran signals readiness for conditional negotiations with the US.saam tv
Published On

रोहित कदम, साम प्रतिनिधी

इराणला नमवणं अमेरिकेच्या हाताबाहेर जाऊ लागलं असतानाच आशियाई राजकारणात मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. इराणने युध्द थांबवण्यासाठी अमेरिकेला घातलेल्या अटींनंतर आता पाकिस्तानात महत्त्वाची बैठक पार पडलीये. इराणनं पाकिस्तानच्या माध्यमातून अमेरिकेसोबत चर्चा करण्यास सशर्त सहमती दर्शवलीये. सशर्त सहमती दर्शवणाऱ्या इराणनं अमेरिकेसमोर कोणत्या अटी समोर ठेवल्यात पाहूयात.

Middle East Crisis:
अमेरिकेत ट्रम्पविरोधात 'नो किंग्स' आंदोलन; 90 लाख नागरीक उतरले रस्त्यावर, कारण काय?

एका रिपोर्टनुसार, अमेरिकेसोबतच्या कोणत्याही मध्यस्थी प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी इराणने पाच प्रमुख अटी ठेवल्या आहेत.

एक प्रमुख मागणी अशी आहे की, इराणवरील हल्ले तात्काळ थांबवावेत.

अमेरिका व इस्रायल भविष्यात आपल्याविरुद्ध कोणतीही लष्करी कारवाई करणार नाही.

इराणला पाकिस्तान, सौदी अरेबिया, इजिप्त आणि तुर्की या चार देशांकडून हमी पाहिजे.

अमेरिका चिंतांचे निराकरण करण्यासाठी या चार देशांनी सक्रिय भूमिका बजावावी.

Middle East Crisis:
रशिया करणार जगाची तेलकोंडी; ट्रम्पनंतर पुतीनचा 'रशिया फर्स्ट'चा पवित्रा

अमेरिकेने मध्य-पूर्वेत आपली लष्करी तैनाती आणखी वाढवली असताना शांतता चर्चेच्या प्रयत्नांनी जोर धरलाय. एकीकडे, इराणमध्ये जमिनीवरील कारवाई करण्याच्या चर्चेला वेग आलाय. तर दुसरीकडे, इराण-अमेरिका युद्धविरामासाठी पश्चिम आशियात जोरदार प्रयत्न सुरू झालेत. अशातच आता इराणच्या मुख्य चिंतांचे निराकरण करण्याची हमी मिळवण्यात यश आले, तर युध्दाच्या ढगांआडून जगाला शांततेचा नवा किरण दिसण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com