US-Israel-Iran War : अमेरिका माघार घेणार, युद्धविराम होणार? ट्रम्प गुरुवारी संबोधित करणार

US-Israel-Iran War update : आखाती देशातील युद्धाची झळ संपूर्ण जगाला बसली आहे. इंधन पूरवठा विस्कळीत झाल्याने लॉकडाऊनची वेळ अनेक देशांवर आली आहे. आणिबाणीची स्थिती आली असतानाच अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविरामाचे संकेत दिलेत. पाहूया एक खास रिपोर्ट...
US-Israel-Iran War
US-Israel-Iran War updateSaam tv
Published On

मध्य-पूर्वेतील युद्धामुळे जगात इंधनकोंडी झाली आहे. भारतासह अनेक देशांमध्ये सर्वसामान्यांना त्याची झळ बसतेय. इराणच्या निकराच्या लढ्यामुळे हे युद्ध लांबलंय. मात्र इराणला गुडघे टेकायला लावण्याचे ट्रम्प आणि नेत्यनाहू यांचे मनसुबे आता फोल ठरल्याचं दिसून येतंय. युद्ध कधी थांबणार ? याकडे जगाचं लक्ष लागलेलं असतानाच अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठं विधान केलंय. इराणमधून बाहेर पडून युद्ध थांबवण्याचे संकेत त्यांनी दिलेत. .

आम्ही इराणमधून बाहेर पडणार आहोत आणि ही प्रक्रिया येत्या 2 ते 3 आठवड्यांत पूर्ण होईल, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं . ट्रम्प यांनी यापूर्वीही एकदा दोन दिवस आणि एकदा पाच दिवस युद्धबंदीची घोषणा करुन इराणला होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्यासाठी मुदत दिली होती. मात्र आपला शब्द न पाळता त्यांनी इराणवर हल्ले केले होते. त्यामुळे ट्रम्प यांच्या खोटेपणावर अनेक राष्ट्रांनी टीकेची झोड उठवली आहे. आता गुरुवारी सकाळी ट्रम्प देशाला संबोधित करणार आहेत.

US-Israel-Iran War
Iran-Israel War: इराणच्या ४०० किलो युरेनियमवर अमेरिकेचा डोळा, अमेरिकन सैन्याचा मास्टर प्लॅन काय?

यात ते इराणसोबतच्या युद्धविरामाबाबत खरचं मोठा निर्णय घेणार का? हे पहावं लागणार आहे. खरतर या निर्णयामागे एक मोठं कारणही आहे. जगावर ज्यांनी युद्ध लादलं, त्यांच्याच खुर्च्या आता धोक्यात आल्यात. अमेरिकेत 'नो किंग्स' आंदोलनाचा वणवा पेटलाय. ट्रम्प आणि युद्धा विरोधात तब्बल 90 लाख नागरिक रस्त्यावर उतरलेत. आपल्याच देशात ट्रम्प एकाकी पडलेत. इस्रायलमध्येही पंतप्रधान नेत्यानाहूंविरोधातही 'नो वॉर'चे नारे घुमतायत.

US-Israel-Iran War
Iran - US War: युद्धाच्या आगीत डोनाल्ड ट्रम्प स्वतःच होरपळले; अमेरिकी प्रशासनात भडका, नेमकं काय घडलं?

दुसरीकडे इटली, फ्रान्स, स्पेन आणि स्वित्झर्लंड यांसारख्या अनेक सहयोगी आणि नाटो सदस्य देशांनी अमेरिकेला लष्करी मदत नाकारली आहे. त्यामुळे एकाकी पडलेली अमेरीका आपली तलवार म्यान करुन खरच एक पाऊल मागे येणार का? इराणच्या अटी शत्रू राष्ट्र मान्य करणार का? आखाती देशातील युद्ध थांबून जगात शांतता नांदणार का? याकडे जगाचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com