Iran Israel War: ट्रम्प नरमले, इराण-इस्त्रायल युद्ध कधी संपणार? राष्ट्राध्यक्षांनी थेट तारीख सांगितली

Donald Trump On Iran Israel War: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा केली आहे. इराण-इस्त्रायल युद्ध थांबवण्याची घोषणा केली आहे.
Iran Isrel War
Iran Isrel WarSaam tv
Published On
Summary

इराण-इस्त्रायल युद्ध थांबणार

९ एप्रिलला युद्ध संपणार

अमेरिकेने केली महत्त्वाची घोषणा

अमेरिकेने एक महत्त्वाची घोषणा केली आहे. इराणसोबतचे युद्ध कधी थांबवणार, याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. इराणसोबतचे युद्ध ९ एप्रिल २०२६ रोजी थांबवणार असल्याची माहिती समोर आली आहे. इराणला दिलेले अल्टीमेटम संपण्याआधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याबाबत संकेत दिले आहे. मध्य-पूर्व देशांमध्ये शांततेचे संकेत दिले आहे. ट्रम्प यांनी पुढील पाच दिवस इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ला न करणार असल्याचे सांगितले आहे.यामुळे युद्ध थांबण्याचे संकेत मिळाले आहे.

Iran Isrel War
Donald Trump: दुसऱ्याचे का असेना, डोनाल्ड ट्रम्प यांना मिळाला नोबेल पुरस्कार, व्हाईट हाऊसमध्ये नेमकं काय घडलं?

ट्रम्प यांनी दावा केला की, दोन्ही देशांमध्ये सकारात्मक चर्चा होत आहे. सुमारे १५ मुद्द्यांवर करार झाले आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या मते, इराणसोबतच्या चर्चेवरुन सर्वसमावेशक करार शक्य आहे की नाही हे ठरणार आहे. इराणने सुरुवातीला चर्चा करण्यास नकार दिला होता. मात्र, त्यानंतर चर्चा करण्यास मान्यता दिले.

पाकिस्तानसह इतर देश ठरले मध्यस्थी- रिपोर्ट

अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, इराणसोबतचे युद्ध संपल्यावर तेलाच्या किंमती मोठ्या प्रमाणात घसरतील.याचसोबत अयातुल्ला अली खामेनेई यांचा मुलगा मोजतबा खामेनेई बेपत्ता आहे, त्याचे काही झाले, याबाबत कोणालाही माहीत नसल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले. याचसोबत अमेरिकन वृत्तसंस्था ऑक्सिऑसच्या वृत्तानुसार, युद्ध संपवण्यासाठी तुर्की, इजिप्त आणि पाकिस्तानच्या प्रतिनिधींनी व्हाईट हाऊसचे दूत स्टीव्ह विटकॉफ यांची भेट घेतली. यानंतर युद्ध संपवण्यासाठी पाऊले उचलण्यात आली.

Iran Isrel War
US Iran conflict : अमेरिकेनं इराणवर डागला बंकर बॉम्ब, इराणनं प्रतिहल्ला केल्यास काय होणार?

पाकिस्तान आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात चर्चा

पाकिस्तानचे सीडीएफ फील्ड मार्शल असिम मुनीर यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा केली होती. मिडिया रिपोर्टनुसार, अमेरिका आणि इराणमध्ये या आठवड्यात इस्लामाबादमध्ये चर्चा होऊ शकते, असा विश्वास इस्त्रायली अधिकाऱ्यांना आहे.

Iran Isrel War
Iran israel War : इराण-इस्रायल युद्धात आता रशियाची एन्ट्री! अमेरिकेला झोंबल्या मिरच्या; पाहा काय घडलं?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com