US Iran conflict : अमेरिकेनं इराणवर डागला बंकर बॉम्ब, इराणनं प्रतिहल्ला केल्यास काय होणार?

America Iran war : अमेरिकेने इराणवर होर्मुझजवळ बंकर बस्टर बॉम्बने हल्ला केल्याने जागतिक तणाव वाढला आहे. इराणने प्रतिहल्ला केल्यास तेल दर, अर्थव्यवस्था आणि जागतिक सुरक्षेवर काय परिणाम होऊ शकतो, जाणून घ्या सविस्तर.
America Iran war
America Iran warSaam TV Marathi
Published On

US bunker buster bomb attack on Iran details : अमेरिकेनं होर्मुझ जलमार्गाजवळील इराणच्या लष्करी तळावर मोठा विध्वस्क हल्ला केलाय.. मात्र अमेरिकेनं होर्मुझमध्ये हल्ला का केला? अमेरिका इराणला नेमका कोणता इशारा देतोय...पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

आखाती युद्धाची ठिणगी आता वणव्यासारखी पसरतेय..अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने इराणवर केलेल्या हल्ल्यानं संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतलयं...अमेरिकेच्या हल्ल्यात होर्मुझ जलमार्गाजवळ इराणच्या शस्त्रास्त्रांचे गुप्त बंकर उद्धवस्त झालेत...मात्र या हल्ल्यात चर्चेचा विषय ठरलाय...GBU 72 हा बंकर बस्टर बॉम्ब...पाताळात जाऊन याचं अमेरिकन बॉम्बनं शत्रूचा शस्त्रसाठा नष्ट केलाय...GBU 72 बंकर बस्टर बॉम्ब किती घातक आहे... पाहूयात...

हा बंकर बस्टर बॉम्ब जमिनीखालील काँक्रीटच्या खोल थरात घुसून स्फोट घडवून आणतो...हा बॉम्ब तब्बल 5 हजार पाऊंड म्हणजे 2268 किलोग्रम वजनाचा आहे.... डोंगरांमध्ये किंवा जमिनीखाली खोलवर लपलेले लष्करी तळ नष्ट करण्यासाठी बॉम्ब तयार करण्यात आला आहे.

दरम्यान याचं बंकर बस्टर बॉम्बनं इराणचे क्षेपणास्त्र तळ उद्धवस्त झाले... ज्यामुळे इराणला अमेरिकनं जहाजांवर हल्ला करण कठीण होणार आहे...मात्र अमेरिकेनं होर्मुझजवळील इराणी तळावर हल्ला नेमका का केला? पाहूयात..

America Iran war
Maharashtra politics crisis : राजकारणात मोठा भूकंप! ठाकरेंचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? पक्ष प्रवेशाची तारीख वेळ ठरली

इराणकडून होर्मुझमधील तेल व्यापारावर बंदी घालण्यात आलीय..जगातील 20 टक्के तेल व्य़ापार याचं जलमार्गातून होतो... तर खर्ग बेटावरून इराण 90 टक्के तेल निर्यात करते... तिथे अमेरिकेनं आधीच हवाई हल्ला केलाय... अशातच अमेरिका आता रणभूमीवर युद्ध छेडण्याच्या तयारीत आहे.. इराणची क्षेपणास्त्र ताकद कमी झाल्यास जगातील तेल व्यापार सुरक्षित होऊ शकतो..यामुळेच अमेरिकेच्या सेट्रल कमांडनं होर्मुझमधील इराणी तळावर हल्ला केलाय...

America Iran war
Accident : फिरायला गेले अन् परतलेच नाही, पिंपरीतील ३ मित्रांचा अपघाती मृत्यू, महागड्या कारचा चुराडा

खरतर अमेरिकेचा हा हल्ला फक्त सुरुवात आहे. जर इराणने क्षेपणास्त्रे किंवा ड्रोननं अमेरिकेवर प्रतिहल्ला केला तर होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे बंद होईल... ज्यामुळे तेलाच्या किंमती आणखी गगनाला भिडतील आणि महागाईचा भ़डका उडेल...त्यामुळे इराणच्या क्षेपणास्त्र तळांवर अमेरिकेनं केलेला हा हल्ला इराणसाठी स्पष्ट इशारा आहे...इराणच्या सर्वात सुरक्षित ठिकाणांवरील या हल्ल्यामुळे युद्धात अमेरिका वरचढ ठरलाय़....त्यामुळे इराण अमेरिकेवर प्रतिहल्ला करून तिसरं महायुद्ध सुरु करणार का? याकडे जगाचं लक्ष लागलयं.

America Iran war
मोठी बातमी! महाराष्ट्रातील भाजप आमदाराची चौकशी होणार, कोर्टानं दिले आदेश, नेमकं प्रकरण काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com