Accident : फिरायला गेले अन् परतलेच नाही, पिंपरीतील ३ मित्रांचा अपघाती मृत्यू, महागड्या कारचा चुराडा

Pimpri Tourist Accident Death : राजस्थानमधील दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघातात पिंपरी चिंचवडमधील तीन तरुणांचा मृत्यू झाला. फॉर्च्यूनर कारचा चुराडा झाला असून या दुर्घटनेमुळे शहरात शोककळा पसरली आहे.
Pimpri Tourist Accident Death
Pimpri Tourist Accident Death
Published On

गोपाल मोटघरे, पिंपरी चिंचवड प्रतिनिधी

Pimpri - Chinchwad, Pune Latest News Update : पिंपरी चिंचवडमधील ३ मित्रांचा राजस्थानमधील भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला. तिघे मित्र २७ फेब्रुवारी रोजी राजस्थानला फिरायला गेले होते. घराकडे माघारी येत असताना आज सकाळी दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर फॉर्च्यूनर कारचा भीषण अपघात झाला. यामध्ये कारचा चुराडा झाला. कारमधील तीन मित्रांचा जागीच मृत्यू झालाय. या दुर्घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड शहरावर दुखाचा डोंगर कोसळलाय.

पिंपरी चिंचवड शहरातील ३ तरुणांच्या आलिशान फॉर्च्यूनर कारचा भीषण अपघात झाला. पर राज्यात पर्यटनासाठी गेलेल्या तरूणावर काळाने घाला घातला अन् ३ जणांचा मृत्यू झाला. मुंबई-दिल्ली महामार्गावर झालेल्या या अपघातानंतर वाहतूककोंडी झाली होती. मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अपघाताची माहिती मिळतच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तात्काळ मृतदेह ताब्यात घेतले अन् पोस्टमार्टमसाठी पाठवले. अपघातग्रस्त वाहने ताब्यात घेऊन पोलिसांनी तात्काळ वाहतूक सुरळीत केली.

Pimpri Tourist Accident Death
Maharashtra politics crisis : राजकारणात मोठा भूकंप! ठाकरेंचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? पक्ष प्रवेशाची तारीख वेळ ठरली

राजस्थान राज्यातून जाणाऱ्या दिल्ली - मुंबई महामार्गावर आज सकाळी भीषण अपघात झाला आहे. या अपघातामुळे पिंपरी चिंचवड शहरावर मोठी शोककळा पसरली आहे. २७ तारखेला फॉर्च्यूनर कार घेऊन जाणाऱ्या तीन तरणांचा मृत्यू झाला. पिंपरी चिंचवड शहरातील तरुणांचा एक ग्रुप पर्यटनासाठी परराज्यात गेला होता. या ग्रुपमध्ये थेरगाव, वाकड आणि महाळुंगे येथील तरुणांचा समावेश आहे. या तीन आलिशान फॉर्च्यूनर कार पैकी एका फॉर्च्यूनर कारला आज सकाळी मुंबई - दिल्ली महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. पोलिसांकडून मृताची ओळख पटवण्यात येत आहे.

Pimpri Tourist Accident Death
पाडव्याआधी सोनं झालं स्वस्त, तोळ्यामागे इतक्या रूपयांनी घसरलं, वाचा 22k, 24k गोल्डचे दर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com