Maharashtra politics crisis : राजकारणात मोठा भूकंप! ठाकरेंचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? पक्ष प्रवेशाची तारीख वेळ ठरली

Shinde vs Thackeray : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता असून उद्धव ठाकरे गटातील अनेक खासदार एकनाथ शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. दिल्लीतील बैठकीनंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे.
Uddhav Thackeray Eknath Shinde
Uddhav Thackeray Eknath ShindeSaam TV Marathi News
Published On

Maharashtra political crisis Shinde vs Thackeray MPs likely to switch sides : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गट आता उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील ठाकरे गटाला आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे अर्धे खासदार एकनाथ शिंदेंच्या शिवेसनेच्या संपर्कात असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीभेटीमागील हेच प्रमुख कारण होतं. मोदी आणि अमित शाह यांच्यासोबतच्या भेटीमध्ये ठाकरेंच्या खासदारांच्या पक्ष प्रवेशावर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे ९ खासदार निवडून आले होते. पण आता यामधील अर्ध्यापेक्षा जास्त खासदार शिंदेंच्या शिवेसनेच्या संपर्कात असल्याचे समजतेय. हे खासदार लवकरच सत्तेत जाणार असल्याची माहिती खात्रालायक सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्री शिंदे नुकतेच दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या अत्यंत महत्त्वाच्या भेटीमध्ये शिंदेंनी आपल्या संपर्कात असलेल्या ठाकरे गटाच्या खासदारांबाबत पंतप्रधानांना सविस्तर माहिती दिल्याची माहिती राजकीय सूत्रांनी दिली आहे.

Uddhav Thackeray Eknath Shinde
पाडव्याआधी सोनं झालं स्वस्त, तोळ्यामागे इतक्या रूपयांनी घसरलं, वाचा 22k, 24k गोल्डचे दर

दिल्लीत खलबतं आणि कायदेशीर चर्चा

एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यात केवळ राजकीय चर्चाच नाही, तर या खासदारांच्या प्रवेशासाठी लागणाऱ्या तांत्रिक आणि कायदेशीर प्रक्रियेवरही (Legal Process) बोलणं झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिंदे गटाचे नेते उदय सामंत हे देखील या दौऱ्यात सहभागी होते. ठाकरे गटाचे जे खासदार संपर्कात आहेत, ते शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी सकारात्मक असल्याचे सांगण्यात येत आहे. योग्य वेळ साधून हा मोठा राजकीय बदल घडवून आणला जाण्याची दाट शक्यता आहे. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यातील या चर्चेमुळे आता राज्यातील राजकारण कोणत्या दिशेला जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लवकरच या खासदारांचा अधिकृत प्रवेश सोहळा पार पडू शकतो, असे संकेत सूत्रांकडून मिळत आहेत.

Uddhav Thackeray Eknath Shinde
पॉश एरियात इमारतीमध्ये अग्निकांड, ६ जण जिवंत जळाले, ३ मुलांचा दुर्दैवी अंत

ठाकरेंच्या शिवसेनेचे ९ खासदार कोणते?

यवतमाळ-वाशिम - संजय देशमुख (शिवसेना ठाकरे गट)

हिंगोली - नागेश पाटील आष्टीकर (शिवसेना ठाकरे गट)

परभणी - संजय जाधव (शिवसेना ठाकरे गट)

नाशिक - राजाभाऊ वाजे (शिवसेना ठाकरे गट)

मुंबई ईशान्य - संजय दिना पाटील (शिवसेना ठाकरे गट)

मुंबई दक्षिण मध्य - अनिल देसाई (शिवसेना ठाकरे गट)

मुंबई दक्षिण - अरविंद सावंत (शिवसेना ठाकरे गट)

शिर्डी - भाऊसाहेब वाकचौरे (शिवसेना ठाकरे गट)

उस्मानाबाद (धाराशीव) - ओमराजे निंबाळकर (शिवसेना ठाकरे गट)

शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार कोणते?

हातकणंगले - धैर्यशील माने (शिवसेना शिंदे गट)

मावळ - श्रीरंग बारणे (शिवसेना शिंदे गट)

मुंबई उत्तर पश्चिम - रवींद्र वायकर (शिवसेना शिंदे गट)

ठाणे - नरेश म्हस्के (शिवसेना शिंदे गट)

कल्याण - श्रीकांत शिंदे (शिवसेना शिंदे गट)

औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) - संदिपान भुमरे (शिवसेना शिंदे गट)

बुलढाणा - प्रतापराव जाधव (शिवसेना शिंदे गट)

Uddhav Thackeray Eknath Shinde
Mumbai-Pune Expressway Accident: मुंबई-पुणे एक्सप्रेसवर भयंकर अपघात, ५ गाड्या एकमेकांवर आदळल्या, ३ जणांचा जागीच मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com