

डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळाला नाही
ट्रम्प यांना अधिकृत नोबेल पुरस्कार मिळालेला नाही
मारिया कोरिना मचाडो यांनी त्यांचा नोबेल पुरस्कार ट्रम्प यांना दिला
व्हाईट हाऊसमध्ये ट्रम्प आणि मारिया यांच्यात भेट झाली
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अखेर नोबेल पुरस्कार मिळाला. गुरुवारी व्हाईट हाऊसमध्ये व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षनेत्या मारिया कोरिना मचाडो यांनी डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान मारिया कोरिना मचाडो यांनी ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार दिल्याचे म्हटले जात आहे. व्हेनेझुएलातील लोकशाही पुनर्संचयित करण्यासाठी लढणाऱ्या लोकांच्या समर्थनाचा एक प्रमुख कार्यक्रम म्हणून ट्रम्प आणि मारिया यांच्या या भेटीकडे पाहिले जात आहे. या भेटीतील सर्वात भावनिक क्षण तेव्हा आला जेव्हा मचाडो यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना त्यांचा नोबेल शांतता पुरस्कार पदक दिले. ट्रम्प यांनी हे पदक स्वीकारले की नाही हे त्यांनी स्पष्ट केले नाही. मचाडो यांनी देखील हा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचे थेट उत्तर देणं त्यांनी टाळले. ते फक्त म्हणाले की हा एक 'प्रतीकात्मक आणि ऐतिहासिक क्षण' आहे.
मारिया कोरिना मचाडो यांना व्हेनेझुएलातील हुकूमशाहीविरुद्धच्या अटळ लढ्यासाठी शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला होता. व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी मचाडो यांचे कौतुक केले आणि त्यांना व्हेनेझुएलाच्या लोकांसाठी एक उल्लेखनीय आणि धाडसी आवाज म्हटले आहे. व्हाईट हाऊसने माचाडोच्या धाडसाचे कौतुक केले असले तरी ट्रम्प यांचे धोरणात्मक मूल्यांकन अद्यापही बदललेले नाही. प्रेस सेक्रेटरी लेविट यांनी स्पष्ट केले की, ट्रम्प यांना अजूनही असे वाटते की व्हेनेझुएलाचे नेतृत्व करण्यासाठी माचाडोकडे सध्या पुरेसा पाठिंबा नाही.
ट्रम्प आणि मारिया कोरिना मचाडो यांच्यात झालेल्या या बैठकीत माचाडोच्या राजकीय भविष्याबद्दल ट्रम्पच्या धोरणात मोठा बदल घडल्याच्या अपेक्षा त्यांनी फेटाळून लावल्या. डोनाल्ड ट्रम्प यांनी आतापर्यंत आठ युद्धे थांबवल्याचा दावा केला आहे. ज्यामध्ये भारत-पाकिस्तान संघर्षाचाही समावेश आहे. त्या बदल्यात ट्रम्प यांनी वारंवार नोबेल शांतता पुरस्काराची मागणी केली आहे. त्यांना पाकिस्तानसारख्या देशांकडून यासाठी पाठिंबाही मिळाला आहे. पण त्यांना यात यश आलेले नाही.
तर नोबेल संस्थेकडून देखील यासंदर्भात प्रतिक्रिया आली आहे. मचाडो ट्रम्प यांना शांतता पुरस्कार देऊ शकत नाहीत असे नोबेल संस्थेकडून स्पष्ट करण्यात आले. व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षनेत्या मारिया कोरिना मचाडो यांना नुकताच मिळालेला नोबेल शांतता पुरस्कार अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना देऊ शकत नाहीत असे नोबेल संस्थेने स्पष्ट केले. व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांना पकडण्यासाठी अमेरिकेच्या मोहिमेचे नेतृत्व करणाऱ्या ट्रम्प यांना त्यांचा पुरस्कार देऊ किंवा त्यांच्यासोबत वाटून घेऊ इच्छितात असे मचाडो यांनी म्हटल्यानंतर नॉर्वेजियन नोबेल संस्थेने हे निवेदन जारी केले. मादुरो यांच्यावर न्यू यॉर्कमध्ये ड्रग्ज तस्करीचे आरोप आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.