Russia Role in Iran israel US War : इराण आणि इस्त्राइल-अमेरिका यांच्यामध्ये दोन आठवड्यांपासून युद्ध सुरू आहे, याचा परिणाम जागातील प्रत्येक देशावर होत असल्याचे चित्र आहे. मागील १५ दिवसात या युद्धात इच्छा नसताना अनेक देश सहभागी झाले आहेत. इस्त्राइलसोबत सुरू असलेल्या युद्धात रशियाने इराणसाठी सर्वात मोठी मदत केली आहे. इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी (Mojtaba Khamenei In Russia) यांच्या सुरक्षेसाठी इराण पुढे आल्याचे वृत्त आंतरराष्ट्रीय मीडियाकडून देण्यात आले आहे. रशियाने मोजतबा खामेनी यांनी इस्त्राइल-अमेरिकेच्या हल्ल्यातून वाचवले आहे. मोजतबा खामेनी हे सध्या गंभीर आजारी असून त्यांच्यावर रशियामध्ये उपचार सुरू असल्याचे वृत्त आहेत. दरम्यान, अमेरिकेकडून इराणला हरवण्यासाठी सर्व प्रयत्न केले जात आहेत. तरीही रशियाकडून इऱाणची मदत केल्यामुळे अमेरिकेला मिरच्या झोंबल्याची चर्चा आहे.
इराण-इस्त्राइल युद्धाचा भडका उडाल्यानंतर रशियाच्या भूमिकेची फक्त चर्चा सुरू होती. पण आता रशियाने यात अधिकृत एन्ट्री केल्याचे समजतेय. अमेरिका अन् इस्त्राइल यांनी अयातुल्ला अली खामेनी यांची हत्या केली होती, त्यानंतर मोजतबा खामेनी हे इराणचे सर्वोच्च नेते झाले. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्पपासून ते नेतान्याहूपर्यंत, सर्व नेत्यांकडून मोजतबा खामेनी यांना टार्गेट करण्यात आले होते. त्यांना दुखापत झाल्याच्या चर्चा आल्या होत्या, याला इराणकडून पूर्णविराम देण्यात आला होता. पण आता अल जरिद या कुवेती वृत्तपत्राने मोजतबा खामेनी हे इराणमध्ये नसल्याचा दावा केला आहे.
इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यामुळे आरोग्य आणि सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना इराणला नेहण्यात आल्या. त्यासाठी अतिशय गुप्त ऑपरेशन केल्याचा दावा अल जरिद या वृत्तपत्रातून करण्यात आला आहे.
रिपोर्ट्सनुसार, मोजतबा खामेनी यांना रशियन लष्करी विमानाने मॉस्कोला नेण्यात आले. या ठिकाणी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे, सध्या त्यांची प्रकृती उत्तम आहे. सुरक्षेच्या कारणास्तव हे पाऊल उचलण्यात आहे. पण या दाव्यामध्ये किती तथ्य आहे अन् किती खोटं , याला अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही. दरम्यान, मागील काही हल्ल्यात मोजतबा खामेनी जखमी झाल्याचा दावा काही अहवालात करण्यात आला. पण मोजतबा खामेनी हे सुरक्षित असल्याची माहिती इराणकडून देण्यात आली आहे.
मोजतबा खामेनी रशियाला कसे गेले, नेमकं ऑपरेशन कसं राबावले ? मोजतबा खामेनी यांना घेऊन जाणारे विमान गुरूवारी मॉस्कोला पोहचल्याचे अहवालात म्हटले आहे. येथील एका सरकारी रूग्णालयात मोजतबा खामेनी यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. क्षेपणास्त्र हल्ला आणि बॉम्बस्फोटामुळे मोजतबा खामेनी यांना इराणच्या बाहेर काढण्यात आले. पुतिन यांनी मोजतबा खामेनी यांना मॉस्कोमध्ये आश्रय दिला होता असा दावाही यामध्ये करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोजतबा खामेनी यांचे लोकेशन लिक होण्याचा धोका वाढला होता, त्यामुळे तात्काळ मॉस्कोला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.