Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढणार, सरकारकडून आले स्पष्टीकरण, वाचा नेमकं काय सांगितलं?

crude oil price increase impact on petrol diesel India : गॅस सिलिंडरच्या दरवाढीनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढणार असल्याच्या चर्चेला सरकारने उत्तर दिले आहे. देशात इंधनाचा पुरेसा साठा असून दर वाढणार नसल्याचे पेट्रोलियम मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
Petrol Diesel Prices Today Mumbai Pune Delhi
Petrol Diesel Prices Today Mumbai Pune Delhi
Published On

Petrol Diesel Prices Today Mumbai Pune Delhi : घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात गेल्या आठवड्यात मोठी वाढ करण्यात आली होती. त्यातच आखाती देशातील युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किंमती (crude oil price increase) वाढल्या अन् इंधनाचा तुटवडा सुरू झाला, त्यामुळे देशात खळबळ उडाली. एलपीजी घेण्यासाठी एजन्सीबाहेर भल्यामोठ्या रांगा लागल्या. त्याशिवाय पेट्रोलच्या किंमती वाढणार (fuel price hike rumours) असल्याचे मेसेज सोशल मीडियावर झळकले अन् देशात पुन्हा एकदा महागाईची चर्चा सुरू झाली. पण खरेच पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ होणार का? केंद्र सरकारकडून या प्रश्नांचं उत्तर देण्यात आले आहे. वाचा केंद्र सरकारकडून नेमकं काय स्पष्टीकरण देण्यात आले.. (petrol diesel price hike rumours India government clarification)

पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढणार का?

आखाती देशातील युद्धामुळे जगभरात कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. मागील १५ दिवसात आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये कच्च्या तेलाच्या किंमतीत ४० टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली होती. भारताच्या शेजारी असणाऱ्या पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये तेलाच्या किंमतीचा स्फोट झाला. त्यामुळे आता आपल्याकडे किंमती वाढणार असल्याची चर्चा सुरू झाली. पण सरकारकडून तेलाच्या दरात कोणतीही वाढ होणार नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

Petrol Diesel Prices Today Mumbai Pune Delhi
LPG-PNG साठी सरकारचा नवा नियम; तर 'या' कुटुंबाला सिलिंडर मिळणार नाही, नवीन कनेक्शनवरही अपडेट
Petrol Diesel Prices Today Mumbai Pune Delhi
मोठी बातमी! अखेर LPG ला पर्याय मिळाला, पुण्यात नव्या गॅसची निर्मिती

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीवर सरकारने काय म्हटले?

पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये कोणताही वाढणार नसल्याचे आश्वासन केंद्र सरकारकडून देण्यात आले आहे. Ministry of Petroleum and Natural Gas कडून एक्सवर अधिकृत पोस्ट करत किंमती स्थिर राहणार असल्याचे सांगितेलय. देशात पेट्रोल आणि डिझेलची कोणतीही कमतरता नाही. सरकारी मालकीच्या तेल विपणन कंपन्यांनी देखील इंधनाची कमतरता नसल्याचे सांगितले आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की,' देशभरातील पेट्रोल पंपांवर पेट्रोल आणि डिझेल पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. लोकांनी घाबरू नये. त्याशिवाय पेट्रोल आणि डिझेलचा असुरक्षित साठा करू नये. कारण यामुळे मोठी दुर्घटना होऊ शकते.' किरकोळ दुकानांना इंधन पुरवठा करताना सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे. कोणतेही उल्लंघन केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असेही केंद्राने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

Petrol Diesel Prices Today Mumbai Pune Delhi
५ राज्यातील विधानसभेचं आज बिगुल वाजणार, बारामतीमध्येही धुरळा उडणार, निवडणूक आयोगाकडून मोठी अपडेट समोर

लोकांनी घाबरून खरेदी करू नये -

पेट्रोल-डिझेलचा देशात मोठ्या प्रमाणात साठा आहे, त्यामुळे लोकांनी घाबरून जाऊ नये. गरज नसताना पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी खरेदी न करण्याचे आवाहन सरकारकडून कऱण्यात आले आहे. दरम्यान, तेल विपणन कंपन्यांनी मीडियाला दिलेल्या माहितीनुसार, देशातील जवळपास १ लाख किरकोळ दुकानांमध्ये कुठेही इंधनाचा तुटवडा जाणवलेला नाही. देशात इंधन आणि गॅस पुरवठा सामान्यपणे सुरू आहे.

Petrol Diesel Prices Today Mumbai Pune Delhi
घर खरेदीपासून ते फिरायला जाण्यापर्यंत, १ एप्रिलपासून ७ नियम बदलणार, वाचा तुमच्यावर काय होणार परिणाम?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com