मोठी बातमी! अखेर LPG ला पर्याय मिळाला, पुण्यात नव्या गॅसची निर्मिती

India Energy Innovation : पुण्यातील सीएसआयआर-एनसीएलच्या शास्त्रज्ञांनी एलपीजीला पर्याय ठरू शकणाऱ्या डायमिथाईल इथर (DME) गॅसच्या तंत्रज्ञानात मोठे यश मिळवले आहे.
एलपीजी संकटावर भारत करणार मात
LPG Crisissaam tv
Published On

सचिन जाधव, पुणे प्रतिनिधी

What is DME gas : एलपीजी (LPG) गॅसच्या तुटवड्यामुळे संपूर्ण जग हैराण झालेले आहे. देशात गॅससाठी रांगा लागल्यात, हॉटेल व्यवसाय ठप्प झालेत. अशातच पुण्याच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरीमधून (NCL) एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. पुण्यातील NCL मधील शास्त्रज्ञांना एलपीजीला पर्याय ठरू शकेल अशा 'डायमिथाईल इथर' (DME) गॅसची निर्मिती करण्यात यश मिळाले आहे. NCL मधील शास्त्रज्ञ डॉ. तिरुमलाईस्वामी राजा आणि त्यांच्या टीमने २० वर्षे संशोधन करून हा गॅस तयार करण्यासाठी लागणारे 'उत्प्रेरक' (Catalyst) प्रयोगशाळेत तयार केले आहे.

या उत्प्रेरकापासून तयार झालेल्या DME गॅसचे व्यावसायिक उत्पादन करण्यातही यश आले आहे. सध्या पायलट प्रोजेक्टमध्ये दररोज २५० किलो प्रमाणात हा गॅस तयार होत आहे. औद्योगिक कंपन्यांसोबत करार करून या गॅसचे मोठ्या प्रमाणात उत्पादन केलं तर १० ते २० टक्क्यांची इंधनाची गरज पूर्ण होईल. यामुळे इंधनासाठी इतर देशांवर असलेले आपले अवलंबित्व कमी होण्यास मदत होईल. मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू झाल्यावर या गॅसची किंमत एलपीजीपेक्षा कमी असेल, असा विश्वास शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.

एलपीजी संकटावर भारत करणार मात
Education Scam : शिक्षण विभागातील सर्वात मोठा घोटाळा, सरकारलाच १५० कोटींचा गंडा, अशी झाली पोलखोल

भारतात आता 'डीएमई' (DME - डायमिथिल ईथर) या इंधनाचे उत्पादन स्वदेशी तंत्रज्ञानातून होणार आहे. एनसीएलचे संचालक डॉ. आशिष लेले यांनी याबाबत माहिती दिली. डॉ. थिरुमलाईस्वामी राजा यांच्या नेतृत्वाखाली २००४ मध्ये या संशोधनाला सुरुवात झाली होती. तब्बल २२ वर्षांच्या मेहनतीनंतर २०२६ मध्ये हे तंत्रज्ञान प्रत्यक्ष उत्पादनासाठी सज्ज झाले आहे. या प्रक्रियेत ६ पेटंट्सची नोंदणी करण्यात आली आहे.

एलपीजी संकटावर भारत करणार मात
Gas Shortage: गॅस सिलिंडरसाठी राज्य सरकारची नवी नियमाली; फडणवीस सरकारनं नेमका काय घेतला निर्णय?

शेतीचा कचरा किंवा जैवइंधनापासून (Biomass) आधी मिथेनॉल तयार केले जाते. त्यानंतर त्यावर रासायनिक प्रक्रिया करून 'डीएमई' मिळवले जाते. या प्रक्रियेसाठी लागणारा मुख्य घटक (कॅटॅलिस्ट) एनसीएलने तयार केला आहे. भारत दरवर्षी मोठ्या प्रमाणात (२०२४ मध्ये २.१ कोटी टन) एलपीजी आयात करतो. 'डीएमई' हा एलपीजीला पूर्णपणे पर्याय ठरू शकतो. विशेष म्हणजे, हा एलपीजीच्या तुलनेत दीडपट अधिक कार्यक्षम आहे.

एलपीजी संकटावर भारत करणार मात
Gold Price Today : सोन्याचे दर पुन्हा घसरले, प्रति तोळा इतकी किंमत; वाचा 24k, 22k, 18k गोल्ड रेट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com