Education Scam : शिक्षण विभागातील सर्वात मोठा घोटाळा, सरकारलाच १५० कोटींचा गंडा, अशी झाली पोलखोल

Nashik education department scam : नाशिक विभागातील शालार्थ आयडी घोटाळ्यात सरकारची तब्बल १५० कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ८४१ शिक्षक-कर्मचारी आणि तत्कालीन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल झाला असून एसआयटीमार्फत या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे.
Education Scam
Education Scamsaam tv
Published On

अभिजित सोनवणे, नाशिक प्रतिनिधी

Nashik division Shalarth ID scam latest news : नाशिक विभागात शिक्षण क्षेत्रात मोठा गैर प्रकार आणि घोटाळा उघड झाला आहे. शालार्थ आयडी घोटाळ्यात चक्क सरकारलाच १५० कोटींचा गंडा घातला आहे. तत्कालीन तीन शिक्षण उपसंचालकांसह ८४१ शिक्षक कर्मचाऱ्यांवर या प्रकरणी गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. हा घोटाळा समोर आल्यानंतर नाशिक विभागातील शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. सरकारकडून या प्रकऱणी काय कारवाई केली जाणार, याची चर्चा शिक्षण क्षेत्रात सुरू आहे.

८४१ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे बनावट शालार्थ आयडी तयार करून फसवणूक केल्याचं उघड झाले आहे. मार्च २०१९ ते जून २०२५ दरम्यान शासनाची कोट्यवधींची फसवणूक करण्यात आली. या फसवणूक प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तत्कालीन शिक्षण उपसंचालक नितीन बच्छाव यांच्या कार्यकाळात ८५ संशयास्पद ड्राफ्ट तर भाऊसाहेब चव्हाण यांच्या काळात ७४७ शालार्थ ड्राफ्ट भरल्याचा संशय आहे.

Education Scam
घरगुती गॅसचा साठा, व्यावसायिकांवर छापा; सामच्या ऑपरेशन सिलेंडरनंतर प्रशासनाला जाग

नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यांतील प्रकरणांमध्ये बनावट कागदपत्रांवर नियमबाह्य शालार्थ आयडी तयार केल्याचा आरोप आहे. शिक्षण आयुक्तांकडे तक्रारीनंतर एसआयटीमार्फत चौकशी होणार आहे. काही ठिकाणी खाडाखोड करून बनावट नोंदी केल्याचे उघड झाले आहे. शिक्षण उपनिरीक्षक श्रीधर देवरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास करण्यात येत आहे. घोटाळ्याचे हे प्रकरण चौकशीसाठी नाशिकच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलेले आहे.

Education Scam
Donald Trump tariff policy : रशियाच्या रागानं ट्रम्पच्या टॅरिफ बॉम्ब फुटला, जागतिक दबावापुढे टाटा बायबाय?

घोटाळा कसा करण्यात आला?

  • बनावट शालार्थ आयडी तयार करण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करण्यात आली.

  • संशयित आरोपींनी संगनमत करून डिजिटल स्वाक्षरीचा गैरवापर केला.

  • काही कागदपत्रांमध्ये खाडाखोड करून बनावट नोंदी करण्यात आल्या.

  • बनावट शालार्थ आदेश खरे भासवून मोठ्या प्रमाणात वेतन बिले तयार करण्यात आली.

  • या माध्यमातून शासनाची तब्बल १५० कोटींची फसवणूक करण्यात आल्याचं समोर आले.

घोटाळा कसा उघड झाला?

  • SIT टीमने मार्च २०१९ ते जून २०२५ या काळातील शालार्थ आदेशांची पडताळणी केली.

  • या पडताळणीत शालार्थ आदेशांची अभिलेख पडताळणी आणि डिजिटायझेशन प्रक्रिया तपासण्यात आली.

  • या तपासात अनेक शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे शालार्थ आदेश कार्यालयीन जावक नोंदीशी जुळत नसल्याचं आढळून आलं.

Education Scam
Gas Cylinder Clash : गॅस सिलेंडरवरुन हाणामारी आणि राडा, एकमेकांची डोकी फोडण्यापर्यंत गेला वाद

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com