Gas Cylinder Clash : गॅस सिलेंडरवरुन हाणामारी आणि राडा, एकमेकांची डोकी फोडण्यापर्यंत गेला वाद

LPG shortage Maharashtra : महाराष्ट्रातील एलपीजी तुटवड्यामुळे गॅस एजन्सीबाहेर मोठ्या रांगा लागल्या असून अनेक ठिकाणी नागरिकांमध्ये संताप उसळला आहे. धुळे, पुणे, मुंबई, नवी मुंबई आणि नागपूरमध्ये सिलेंडर उशिरा मिळाल्याने वाद, हाणामारी आणि गोंधळाच्या घटना समोर आल्या आहेत.
LPG shortage in Maharashtra today
LPG shortage in Maharashtra today Saam TV Marathi
Published On

LPG shortage in Maharashtra today : गॅस टंचाईनं साऱ्या देशालाच जेरीस आणलंय. मात्र महाराष्ट्रात ही टंचाई आता एकमेकांची डोकी फोडण्यापर्यंत गेलीय. गॅस गॅस सिलेंडरसाठी आलेले ग्राहक आणि SRPF जवानांमध्येच हाणामारी झाल्याची घटना समोर आलीय. ही घटना कुठे आणि का घडली पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.

हा उद्रेक आहे धुळ्यातील गॅस एजन्सीवरचा. आग ओकणाऱ्या उन्हात उभा असलेल्या संतापलेल्या लोकांनी थेट कर्तव्य बजावणाऱ्या एसआरपीएफच्या जवानालाच बेदम मारहाण केली.खरं तर आखातात युद्ध पेटल्यापासून देशात गॅस टंचाईसदृश्य परिस्थिती निर्माण झालीय... त्यातच धुळ्यात नागरिकांची घरगुती गॅस सिलेंडरसाठी गर्दी झाली.. बुकिंग करुनही गॅस मिळेना... त्यामुळे नागरिक संतप्त झाले... आणि सुरक्षेसाठी आलेल्या एसआरपीएफ जवानाबरोबर चकमक झाली.

दुसरीकडे देशाची आर्थिक राजधानी मुंबईतही गॅस सिलेंडरसाठी नागरिकांनी लांबच्या लांब रांगा लावल्या आहेत. तर नवी मुंबईत बुकिंग करुनही गॅस मिळत नसल्यानं नागरिकांमध्ये संताप आहे. गॅस एजन्सीबाहेर गर्दी... हे चित्र फक्त धुळे आणि नवी मुंबईतच नाही तर राज्यातील अनेक भागांमध्ये दिसतंय. नागपूरमध्येही नागरिकांनी गॅस सिलेंडरसाठी लांबच्या लांब रांगा लावल्या आहेत...

LPG shortage in Maharashtra today
घरगुती गॅसचा साठा, व्यावसायिकांवर छापा; सामच्या ऑपरेशन सिलेंडरनंतर प्रशासनाला जाग

अगदी अशाच रांगा पुण्यातही लागल्या आहेत. गॅस सिलेंडर मिळावा म्हणून नागरिक सकाळी 6 पासून गॅस एजन्सीबाहेर उभे राहताहेत. मात्र गॅसच मिळत नसल्यानं नागरिकांनी नाराजी व्यक्त केलीय. एवढंच नाही तर पुण्यात पोलीस आणि संतप्त नागरिकांमध्ये चकमकही झालीय. आखातातील युद्धाची झळ भारताला बसतेय... नागरिक गॅस एजन्सीबाहेर सिलेंडरसाठी गर्दी करत आहेत... तर सरकार देशात तुटवडा नसल्याचा दावा करत आहे...एकीकडे देशात तुटवडा नसल्याचं सरकार सांगत असतानाच वारंवार नियम बदलले जाताहेत..

LPG shortage in Maharashtra today
महागाईचा भडका! गॅस संपला, आता लाकूडही महागले; दर ऐकून सरकेल पायाखालची जमीन

7 मार्चला घरगुती गॅसच्या दरात 60 रुपयांची वाढ करण्यात आली.. त्यानंतर 8 मार्चला गॅस बुकिंगनंतर 21 दिवसांनी सिलेंडर देण्याचा निर्णय घेतला.. तर 9 मार्चला एस्मा कायदा लागू केला आणि गॅस पुरवठ्याचं अंतर 25 दिवस करण्यात आलं... त्यानंतर 10 मार्चला ग्रामीण भागासाठी 40 दिवसांचं अंतर ठेवण्याचं जाहीर केलं.आणि अखेर 12 मार्चला ग्रामीण भागातील जनतेला बुकिंगनंतर 45 दिवसांनी गॅस पुरवठा करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय. गॅस टंचाईवरून सरकारी यंत्रणा सगळे काही सुरळीत असल्याचा दावा करत असली तरी प्रत्यक्षातील चित्र वेगळंच आहे.त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधीच सरकारने गॅस पुरवठा सुरळीत करण्याबाबत योग्य पावलं उचलणं गरजेचं आहे.

LPG shortage in Maharashtra today
Mumbai Pune : उन्हाळी सुट्टीत घरी जाणाऱ्यांसाठी खुशखबर, मुंबई-पुण्यातून तब्बल १४८४ स्पेशल ट्रेन धावणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com