घरगुती गॅसचा साठा, व्यावसायिकांवर छापा; सामच्या ऑपरेशन सिलेंडरनंतर प्रशासनाला जाग

LPG black market news Maharashtra : सामच्या ऑपरेशन सिलेंडरनंतर महाराष्ट्रात एलपीजी साठेबाजी आणि काळाबाजाराविरोधात प्रशासन अॅक्शन मोडमध्ये आले आहे. यवतमाळ, परभणी, जालना, बीड, भंडारा आणि मुंबईसह अनेक ठिकाणी छापेमारी करून सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत.
LPG black market news Maharashtra
LPG black market news Maharashtra
Published On

LPG black marketing, Maharashtra administration raids सामच्या ऑपरेशन सिलेंडरनंतर आता सरकार अॅक्शन मोडवर आलयं... साठेबाजांविरोधात प्रशासनानं कारवाईचा बडगा उगारलाय...आतापर्यंत कोणत्या जिल्ह्यात किती व्यावसायिकांवर छापा टाकण्यात आलाय... पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून..

हा व्हिडीओ कुठल्या गॅस एजन्सीतील सिलेंडरचा नाही... तर हा व्हिडीओ आहे आखाती देशातील युद्धामुळे कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या दलाल आणि साठेबाजांचा.... साम टीव्हीनं ऑपरेशन सिलेंडरच्या माध्यमातून काळाबाजार चव्हाट्यावर आणला... सरकारनं काळाबाजार करणाऱे दलाल आणि साठेबाजांविरोधात भरारी पथकांनी छापेमारी सुरु केली...

यवतमाळच्या पुसदमध्ये साठेबाजी केलेल्या अरिफ मोहम्मद कच्छी याने घरातच सिलेंडरची साठेबाजी केल्याची कुणकुण प्रशासनाला लागली... आणि थेट अरिफ मोहम्मद कच्छीच्या घरावर छापा मारला... त्यात प्रशासनाने 41 गॅस सिलेंडरसह 23 रेग्युलेटर आणि अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय... एवढंच नाही तर साठेबाजांवर कारवाईचा बडगा सुरुच राहणार असल्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिलाय..

LPG black market news Maharashtra
Donald Trump tariff policy : रशियाच्या रागानं ट्रम्पच्या टॅरिफ बॉम्ब फुटला, जागतिक दबावापुढे टाटा बायबाय?

हे कमी होतं की काय... परभणीत हॉटेल आणि घरांवर मारलेल्या छाप्यात 46 सिलेंडरचा साठा जप्त केलाय...

दुसरीकडे जालन्याच्या अंबडमध्येही पुरवठा विभागानं छापेमारी केली.. आणि 36 सिलेंडर जप्त केलेत....

एवढंच नाही तर बीडचा पुरवठा विभागही अॅक्शन मोडवर आलाय.. 203 ठिकाणी केलेल्या छापेमारी केलीय.. त्यात 28 सिलेंडर जप्त केले आहेत... दुसरीकडे 3 हॉटेलवर छापे मारत 11 सिलेंडर जप्त करुन हॉटेल चालकांवर गुन्हे दाखल केलेत....

हा साठेमारीचा सिलसिला फक्त यवतमाळ आणि बीडपुरता मर्यादित नाही... तर या साठेबाजीची कीड विदर्भातील भंडाऱ्यापर्यंत पोहोचलीय... भंडाऱ्यातही गॅस सिलेंडरचा काळाबाजार करणाऱ्यांवर छापा मारुन पुरवठा विभागाने 37 सिलेंडर जप्त केलेत...

LPG black market news Maharashtra
Mumbai Pune : उन्हाळी सुट्टीत घरी जाणाऱ्यांसाठी खुशखबर, मुंबई-पुण्यातून तब्बल १४८४ स्पेशल ट्रेन धावणार

दुसरीकडे देशाची आर्थिक राजधानीही गॅसच्या काळ्याबाजाराने हादरलीय.... जोगेश्वरी पूर्वच्या पूनम नगर परिसरात गॅस एजन्सीमध्ये काळाबाजार झाल्याचं समोर आलंय.. अनेक ग्राहकांच्या मोबाईलवर सिलेंडर डिलिव्हर्ड असा मेसेज आलाय... त्यामुळे हा काळाबाजार असल्याची शंका नागरिकांनी व्यक्त केलीय...

साम टीव्हीनं ऑपरेशन सिलेंडरच्या माध्यमातून गॅस सिलेंडरच्या काळ्या बाजाराचं भीषण वास्तव समोर आल्यानं उशीरा का होईना पण सरकार जागं झालंय... मात्र ही कारवाई आणखी तीव्र करुन साठेबाजी आणि काळाबाजार करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्याची गरज आहे.

LPG black market news Maharashtra
रत्नागिरीत गॅस एजन्सीनं LPG गॅस सिलिंडर बुकिंगचे नियम बदलले, ग्रामीण अन् शहरी भागासाठी नवी अट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com