commercial LPG shortage forcing hotels to cook on wood stoves : गॅसच्या शेगडीवरून हळूहळू स्वयंपाक आता चुलीवर केला जातोय. संभाजीनगरमध्ये घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत आहे. मात्र व्यावसायिक गॅस मिळत नसल्यामुळे हॉटेल चालक गॅस ऐवजी लाकडाच्या चुलीवर स्वयंपाक करण्याकडे वळले आहेत. त्यामुळं आता लाकडांची मागणी वाढली आहे. मागणी वाढल्याने दरही वाढू लागलेत. चार पाच किलोने मिळणारा लाकूड आता आठ तर १२ रुपये किलोने मिळू लागला आहे.
दरम्यान, काँग्रेसने छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चुल पेटवून गॅस दरवाढ आणि गॅस मिळवण्यासाठी सर्व सामान्यांना रांगेत उभे राहावे लागतेय या निषेधार्थ आंदोलन सुरू केले आहे. संभाजीनगरात दुसरीकडे गॅस सिलेंडर मिळत नसल्यानं लाकडांची मागणी वाढलीय. त्यामुळे त्यांच्या दरातही वाढ झालीय. 4 ते 5 रुपये किलोनं मिळणारं लाकूड आता थेट 12 रुपयांवर पोहोचलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.