tax
tax Saam Tv

घर खरेदीपासून ते फिरायला जाण्यापर्यंत, १ एप्रिलपासून ७ नियम बदलणार, वाचा तुमच्यावर काय होणार परिणाम?

New Tax Rules April 2026: एक एप्रिल २०२६ पासून, म्हणजेच नव्या आर्थिक वर्षांपासून टॅक्सच्या निमात मोठे बदल होणार आहे. या ७ बदलांबाबत सर्वांना माहिती असणं गरजेचं आहे.
Published on

New tax rules from April 2026 : नवीन आर्थिक वर्षांपासून टॅक्समध्ये महत्त्वाचे ७ बदल होणार आहे. याचा थेट परिणाम तुमच्या आमच्यावर होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री सीतारमण यांनी बजेटमध्ये केलेल्या घोषणा एक एप्रिलपासून लागू होणार आहे. ७ नव्या नियमांचा प्रभाव नोकरदार, व्यापारी अन् गुंतवणूकदारांसोबतच सर्वसामान्यांवरही होणार आहे. सरकारकडून काही व्यक्तींसाठी आयकर रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम तारीखही वाढविण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना कागदपत्रे पूर्ण करण्यासाठी अधिक वेळ मिळेल. सरकारने काही नवीन कर सवलती देखील लागू केल्यात, त्यामुळे काही प्रमाणात कर कमी होणार आहे. एक एप्रिलपासून नेमके कोणते बदल होणार आहेत? कुणावर काय परिणाम होणार? याबाबत जाणून घेऊयात...

शेअर बायबॅकवरील नवीन कर नियम

एखादी कंपनी गुंतवणूकदाराकडून स्वत:चे शेअर्स परत खरेदी करते, त्या प्रक्रियेला बायबॅक असे म्हटले जाते. शेअर्स खरेदी केल्यानंतर त्यातून मिळणारे उत्पन्न लाभांश मानले जात होते, त्यावर आयकर स्लॅबनुसार कर आकारला जात होता. पण आता हे भांडवली नफा मानले जाईल. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे, आता शेअर्सच्या सर्व रकमेवर कर भरावा लागणार नाही. तर फक्त शेअर्स विकून मिळेलेल्या न्यावरच कर भरावा लागणार आहे. उदा. समजा तुम्ही १००० रूपयांचा शेअर्स खरेदी केला. कंपनीने हा शेअर्स १४५० रूपयांना पुन्हा खरेदी केला. यात तुम्हाला फक्त वरील ४५० रूपयांवरच कर टॅक्स भरावा लागेल. आधी संपूर्ण रकमेवर कर भरावा लागत होता.

फ्युचर्स आणि ऑप्शन्स ट्रेडिंग महाग

शेअर बाजारातील फ्युचर्स अँड ऑप्शन्स (F&O) ट्रेडिंग आता एक एप्रिलपासून महाग असेल. कारण सरकारला जास्त कर भरावा लागणार आहे. फ्युचर्ससाठी आता ०.०५% कर भरावा लागणार आहे, याआधी हा कर ०.०२% इतकाच होता. ऑप्शन्सवरील कर ०.१% वरून ०.१५% पर्यंत वाढला आहे. म्हणजेच आता प्रत्येक वेळी व्यापार करता तेव्हा तुम्हाला जास्त कर भरावा लागेल. यामुळे नफा गमी होणार आहे.

सॉवरेन गोल्ड बॉण्ड्स (SGB) वरील नवीन नियम

थेट सरकारकडून बाँड खरेदी केले असतील आणि ते मुदतपूर्तीपर्यंत ठेवले, तर नफ्यावर कोणताही कर भरावा लागणार नाही. पण जर तुम्ही हे बाँड शेअर बाजारात तुम्ही दुसऱ्या कोणाकडून खरेदी केले, तर आता त्या बँडच्या विक्रीतून मिळालेल्या नफ्यावर कर आकारला जाईल. म्हणजेच काय तर सेकंड-हँड बाँड खरेदीदारांसाठी करमुक्त लाभ आता संपला आहे.

म्युच्युअल फंडांमधून मिळणारे उत्पन्न

शेअर्समधून मिळणारा लाभांश अथवा म्युच्युअल फंडांवर मिळणारे व्याज आता बंद केले आहे. आधी जर गुंतवणूक करण्यासाठी पैसे उधार घेतले असतील, तर तुम्ही तुमच्या गुंतवणुकीच्या उत्पन्नातून त्या कर्जावरील व्याजाच्या २०% पर्यंत वजा करू शकता. पण यामुळे करपात्र उत्पन्न कमी झाले. पण आता हा नियम पूर्णपणे बंद केला आहे.

फॉर्म १५जी/१५एच सादर करणे सोपे झाले

वार्षिक उत्पन्न कर सवलत मर्यादेपेक्षा कमी असेल, तर टीडीएस कपात टाळण्यासाठी फॉर्म १५जी किंवा फॉर्म १५एच दाखल करता येईल. आधी हे फॉर्म वेगवेगळ्या कंपन्यांना किंवा फंड हाऊसना पाठवावे लागत होते. हा त्रास आता कमी करण्यात आला आहे. शेअर्स आणि म्युच्युअल फंड डीमॅट स्वरूपात असल्याने, हे फॉर्म एकाच ठिकाणी सबमिट केल्यास सर्व सिक्युरिटीजवरील टीडीएसचा त्रास कमी होईल.

घर किंवा जमीन खरेदी करणे सोपे

१ एप्रिलपासून, तुम्हाला TAN क्रमांकाची ( कर कपात खाते क्रमांक ) आवश्यकता राहणार नाही. तुम्ही तुमच्या पॅन किंवा आधार कार्डचा वापर करून TDS कापू शकता आणि जमा करू शकता.

परदेश प्रवास स्वस्त

परदेश प्रवास आता स्वस्त झालेला आहे. आता पॅकेज बुक करताना सरकारक़ून घेतला जाणारा कर मर्यादीत केला आहे. तुम्ही किती रूपये खर्च केल तर फक्त २ टक्केच टीसीएस आकारला जाणार आहे. याआधी ७ लाखांपर्यंत ५ टक्के, तर त्यापुढील खर्चावर २० टक्के कर आकारला जात होता. पण आता सरसकट सर्व रक्कमेवर दोन टक्केच कर आकारण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com