LPG-PNG साठी सरकारचा नवा नियम; तर 'या' कुटुंबाला सिलिंडर मिळणार नाही, नवीन कनेक्शनवरही अपडेट

LPG-PNG New Rule: तुमच्याकडे घरगुती गॅसचे डबल कनेक्शन आहे का? तुमच्याकडे एलपीजी गॅस सिलिंडर आणि गॅस पाईपलाईन, दोन्ही असल्यास तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे; कारण सरकारने शनिवारी यासंदर्भात नवे नियम जारी केले आहेत.
Government Introduces New LPG-PNG Rule:
Government Introduces New LPG-PNG Rule:Saam TV Marathi
Published On

Government Introduces New LPG-PNG Rule: एलपीजी आणि पीएनजी गॅस ग्राहकांसाठी केंद्र सरकारने नवीन नियमावली जाहीर केली आहे. ज्यांच्याकडे घरगुती गॅसचे 'डबल कनेक्शन' आहे, त्यांच्यावर याचा थेट परिणाम होणार आहे. एलपीजी गॅस सिलिंडर आणि गॅस पाईपलाईन अशा दोन्ही सुविधा वापरणाऱ्यांसाठी सरकारने नवीन नियम लागू केले आहेत. त्याशिवाय, ई-केवायसी (e-KYC) करणे आता अनिवार्य झाले आहे. जर ई-केवायसी पूर्ण नसेल, तर नवीन कनेक्शन घेणाऱ्यांवर आणि सिलिंडर बुकिंग करणाऱ्यांवर याचा थेट परिणाम होईल.

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने घरगुती स्वयंपाकाच्या गॅस (LPG) पुरवठ्याबाबत शनिवारी महत्त्वाचा बदल केला आहे. नवीन नियमांनुसार, ज्या कुटुंबांकडे आधीच पाईपद्वारे नैसर्गिक वायू (PNG) कनेक्शन आहे, त्यांना आता घरगुती एलपीजी सिलिंडर दिले जाणार नाहीत. पीएनजी आणि एलपीजी अशी दोन्ही कनेक्शन असणाऱ्या ग्राहकांना त्यांचे एलपीजी कनेक्शन तात्काळ परत करावे लागेल. सरकारकडून शनिवारी यासंदर्भातील अधिकृत नियमावली जारी करण्यात आली आहे.

Government Introduces New LPG-PNG Rule:
Kim Jong : इराण-इस्त्राइल युद्धावेळी किम जोंग यांचा धमाका, थेट बॅलिस्टिक मिसाइल सोडली, शेजारच्या देशात हायअलर्ट

नव्या नियमावलीत नेमके बदल कोणते?

सरकारकडून गॅस कनेक्शन असणाऱ्यांसाठी ईकेवायसी अनिवार्य करण्यात आलेली आहे. ज्या कुटुंबांनी अजून आपली बायोमेट्रिक ओळख (ई-केवायसी) अपडेट केलेली नाही, त्यांना नवीन गॅस कनेक्शन घेताना अडचणी येतील. आधार कार्ड लिंक नसेल अथवा पत्त्यात तफावत असेल तर नवीन सिलेंडर मिळणे कठीण होईल.

Government Introduces New LPG-PNG Rule:
Gas Shortage: गॅस सिलिंडरसाठी राज्य सरकारची नवी नियमाली; फडणवीस सरकारनं नेमका काय घेतला निर्णय?

अन्यथा बुकिंग बंद -

एलपीजीच्या जुन्या ग्राहकांना ठराविक मुदतीत केवायसी अपडेट करावीच लागेल. अन्याथा त्यांचे गॅस सिलेंडर बुकिंग थांबवले जाऊ शकते.गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याशिवाय एकाच्याच नावावर अनेक गॅस कनेक्शन असतात, त्यावरही या निर्णायामुळे चाप बसणार आहे.

Government Introduces New LPG-PNG Rule:
रत्नागिरीत गॅस एजन्सीनं LPG गॅस सिलिंडर बुकिंगचे नियम बदलले, ग्रामीण अन् शहरी भागासाठी नवी अट

सरकारनं नेमका काय निर्णय घेतला ?

आता एकाच घरात पीएनजी (PNG-पाईप गॅस) आणि एलपीजी (LPG सिलेंडर) दोन्ही कनेक्शन ठेवणे बेकायदेशीर ठरेल.

ज्यांच्याकडे सक्रिय पीएनजी कनेक्शन आहे, ते यापुढे त्यांचे जुने एलपीजी सिलेंडर पुन्हा बुक करू शकत नाहीत.

ज्यांच्याकडे दोन्ही सुविधा आहेत त्यांना त्यांचे घरगुती एलपीजी कनेक्शन तात्काळ परत करावे लागेल.

पाईप गॅस (PNG) ग्राहकांना आता नवीन घरगुती एलपीजी कनेक्शनसाठी अर्ज करता येणार नाही.

Government Introduces New LPG-PNG Rule:
LPG shortage : देशात गॅस सिलिंडरचा तुटवडा, खासदारांना संसदेत चहा-कॉफीही मिळेना, खासदाराच्या दाव्याने खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com